---Advertisement---

प्रो कबड्डी: फजलच्या मुंबाचा धमाका! तेलगू टायटन्सला केले नामोहरम

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 9:38 PM
u-mumba
---Advertisement---

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ४१ व्या सामन्यात यु मुंबा व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर आले. फजल अत्राचलीच्या नेतृत्वाखालील यु मुंबाने सिद्धार्थ देसाई व रोहित कुमार या अनुभवी रेडरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या तेलुगु संघाला अक्षरशः नामोहरम करत मोठ्या विजयाची नोंद केली.

पहिला सामन्यातप्रमाणे हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा कबड्डी प्रेमींना होती. मात्र, मुंबाने तेलगू संघाला अजिबात डोके न वर काढू देता सामन्यावर पहिल्या मिनिटापासून पकड निर्माण केली. पहिल्या हाफमध्ये अभिषेक व अजित या मुंबईच्या रेडर्सने प्रत्येकी सात गुण घेत २८-१३ अशी मोठी आघाडी संघाला मिळवून दिली. फजल अत्राचली व रिंकू यांनी डिफेन्समध्ये योगदान दिले.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला तेलगू संघाने आपला तिसरा ऑल आऊट दोन गड्यांच्या जोरावर तब्बल सात मिनिटे टाळला. मात्र, रिंकूने हाय फाइव्ह करत संघाची आघाडी दुप्पट केली. तेलगू टायटन्सनेही एक वेळा मुंबईला ऑल आउट करत पिछाडी कमी करण्याचे काम केले. परंतु, अखेरीस मुंबाने ४८-३८ असा विजय साजरा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---