---Advertisement---

धोनीला खेळताना पाहायची शेवटची संधी? चाहत्यांनी खरेदी केली लाखोंची तिकिटे; असे आहेत दर

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 5:24 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने सामने येणार आहेत. दरम्यान इतके रिकामे असलेले स्टेडियम चेन्नई सुपर किंग्स संघ अंतिम फेरीत पोहचल्यामुळे खचाखच भरलेले दिसून येणार आहेत. कारण अवघ्या काही तासातच या सामन्याचे सर्व तिकीट विकले गेले आहेत.

चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत सर्वप्रथम आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायर २ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच या सामन्याचे सर्व तिकीट विकले गेले होते. याचे मुख्य कारण म्हणजे चाहत्यांचा असा समज आहे, की हा एमएस धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो.

कोरोना असल्या कारणाने स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील काही बंधने लादण्यात आली आहेत. ज्यांनी कोरोनाचे दोन लस घेतले आहेत, त्यांनाच तिकीट दिले जात आहे. अंतिम सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. या स्टेडियममध्ये २५ हजार लोक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु ५०% प्रेक्षकांना सामना पाहण्याची अनुमती असल्यामुळे, १२,५०० प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावू शकतात. यापैकी १२,४६४ तिकीट विकले गेले आहेत. तर १ लाख किमतीचे अवघे ३६ तिकिटे शिल्लक राहिले आहेत.

यापूर्वी प्लेऑफच्या सामन्यात १ लाख पेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्या गेल्या होत्या. असे आयोजकांनी म्हटले आहे. परंतु हा सामना पाहण्यासाठी लोक १ लाखाचे देखील तिकीट खरेदी करायला तयार आहेत.

असे आहेत तिकिटांचे दर: 

१)जनरल सिट – गुरुवारी रात्रीपर्यंत १०० टक्के तिकीट विकले गेले होते. याची किंमत २०० दिरहाम म्हणजे, ४ हजार रुपये इतकी आहे.

२)जनरल एंटरेंसचे तिकीट – यामध्ये प्रेक्षकांना सीमारेषेच्या अगदी जवळच्या सिट वर बसण्याची व्यवस्था असते. या तिकीटाची किंमत ४०० दिरहाम म्हणजे ८ हजार रुपये इतकी आहे.

३) ड्रेसिंग रूमच्या अगदी जवळ असलेली सिट – या तिकीटाची किंमत ७०० दिरहाम म्हणजे १४ हजार रुपये इतकी आहे. यामध्ये प्रेक्षकांना ड्रेसिंग रूमच्या जवळपास असलेल्या सिट मिळत असतात. हे तिकीट देखील १००% विकले गेले आहेत.

४) प्लॅटिनम तिकीट – ज्या स्टँडमध्ये खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य बसतात,ते तिकीट प्लॅटिनम तिकीट या नावाने विकले जात आहेत. ज्याची किंमत १२०० दिरहाम म्हणजे २०,४०० रुपये इतकी आहे. हे तिकीट देखील विकले गेले आहेत.

५)ग्रँड लाँज तिकीट – व्हीआयपी प्रेक्षकांसाठी हे तिकीट असते. अनेकदा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली,सचिव जय शाह आणि इतर पदाधिकारी इथे बसतात. तर काही खेळाडू आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील इथे बसवत असतात. याची किंमत ५००० दिरहाम म्हणजेच १ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये २७८ सिट उपलब्ध होत्या. या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ; चेन्नई अव्वल क्रमांकावर, तर मुंबई…

मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ ३९२ विकेट्स घेणारा क्रिकेटर, ब्रेन ट्यूमरमुळे आयसीयूमध्ये दाखल

खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलेला दिसला विराट; नेटकरी म्हणे, ‘भारत असाच टी२० विश्वचषक जिंकेल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---