इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत. आयपीएलचा सर्वाधिक ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स चालू हंगामात निराशाजनक प्रदर्शन करतोय. नुकताच शनिवारी (१६ एप्रिल) लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धचा हंगामातील २६वा सामना मुंबईने १८ धावांनी गमावला आहे. अशाप्रकारे मुंबईने त्यांचे हंगामातील सलग ६ सामने गमावले आहेत.
सहभागी १० संघांमध्ये मुंबई हा एकटा असा संघ आहे, जो आतापर्यंत त्यांच्या विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेला या संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची समीकरणे कठीण झाली आहेत. परंतु अद्याप त्यांच्यासाठी प्लेऑफची दारे बंद झालेली नाहीत.
मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी काय करावे लागेल?
चालू हंगामातील (IPL 2022) आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबई संघाचे (Mumbai Indians) अजून ८ सामने खेळायचे बाकी आहेत. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या ८ पैकी आठही सामने जिंकावे लागणार आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. मात्र जर त्यांनी पुढील आठही सामन्यात विजय मिळवला, तर त्यांच्या खात्यात १६ गुण जमा होतील. परंतु नेट रन रेटच्या बाबतीत त्यांना इतर संघांकडून आव्हान मिळू शकते. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी १६ गुणांसह चांगल्या नेट रन रेटचीही गरज भासेल, जेणेकरून त्यांना गुणतालिकेत पहिल्या ४ संघांमध्ये जागा बनवता (Mumbai Indians Play Off Equations) येतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मुंबई इंडियन्सची उडालीय पुरती दैना
मुंबई संघासाठी आयपीएलचा चालू हंगाम भयावह स्वप्नासारखा राहिला आहे. त्यांनी हंगामाची सुरुवातच पराभवाने केली होती. सालाबदप्रमाणे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा त्यांचा हंगामातील पहिला सामना ४ विकेट्सने गमावला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने मुंबईला २३ धावांनी पराभूत केले होते. पुढे कोलकाता नाईट रायडर्स (५ विकेट्स), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (७ विकेट्स), पंजाब किंग्ज (१२ धावा) आणि आता लखनऊ सुपरजायंट्सने मुंबईला पराभवाचे तोंड दाखवले आहे.
मुंबई संघाचा पुढील सामना २१ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. आता हा संघ कमीत कमीत चेन्नईविरुद्ध आपल्या पराभवाची मालिका मोडतो की नाही? हे पाहावे लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
डिविलियर्स सोबतच्या नात्याबद्दल ‘बेबी एबी’ ब्रेविसने केला खुलासा; म्हणाला, ‘खूप खास नाते आहे’
कब खून खौलेगा रे तेरा! पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर रोहितवर संतापले नेटकरी