मंगळवारी (७ जुलै) भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपला वाढदिवस साजरा केला. त्याला त्याच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त अवघ्या क्रिकेट जगतातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचदरम्यान धोनीसोबत खेळलेला एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला.
एमएस धोनीच्या ३९ व्या वाढदिवसावेळी त्याचा संघसहकारी दुखापतग्रस्त
धोनीला (MS Dhoni) आपल्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळाल्या. परंतु यादरम्यान आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळलेला न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणजेच ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) एका रग्बी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला.
धोनीबरोबर सीएसकेकडून खेळलेला ब्रेंडन मॅक्यूलम दुखापतग्रस्त; झाला रुग्णालयात दाखल
न्यूझीलंडचा माजी महान यष्टीरक्षक फलंदाज मॅक्यूलमने धोनीच्या वाढदिवसा वेळी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला. त्यामध्ये तो एका रुग्णालयात बेड वर झोपलेला दिसत आहे.
खरंतर तो शनिवारी (४ जुलै) न्यूझीलंडमध्ये एका रग्बी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्या दरम्यान तो त्या सामन्यात युनायटेड माटामाटा संघाकडून खेळत होता. या सामन्यात त्याच्या संघाने ३२-३० च्या अंतराने विजय मिळविला होता. परंतु यादरम्यान त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
https://www.instagram.com/p/CCVSVv-Hect/?utm_source=ig_web_copy_link
मॅक्यूलम आता आहे कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक
मॅक्यूलम तसं पाहिलं तर आपल्या दुखापतीतून बरा होत आहे. परंतु त्याने फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते लगोलग त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मॅक्यूलमने न्यूझीलंडचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.
याव्यतिरिक्त आयपीएलमध्येही बऱ्याच संघाकडून तो खेळला आहे. त्यात सीएसकेकडून धोनीच्या नेतृत्वातही काही वर्षे खेळला आहे. सध्या तो आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिनच्या अखेरच्या वनडेत खेळलेले ११ खेळाडू सध्या करतात तरी काय?