---Advertisement---

पहिला कसोटी सामना: नाणेफेकीच्या वेळी जेसन होल्डरला आयसीसीच्या नियमांचा विसर, केली ही सर्वात मोठी चूक

On: गुरूवार, जुलै 9, 2020 10:03 AM
---Advertisement---

मुंबई । साउथॅम्पटन बुधवारपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. तब्बल 116 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. कोरोना  व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार या कसोटी मालिका सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा कर्णधार नाणेफेक वेळी आयसीसीचे नवे नियम विसरून गेला आणि मोठी चूक केली.

नाणेफेकीसाठी जेसन होल्डर आणि बेन स्टोक्स मैदानात आल्यानंतर अशी घटना घडली ते पाहून क्रिकेट फॅन्स देखील चकीत झाले.  साउथॅम्पटनच्या मैदानावर पावसाने हजेरी लावल्यामुळे लंचनंतर नाणेफेक झाली. इंग्लंडचा नवा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

याच दरम्यान, जेसन होल्डरने आयसीसीच्या नियमाचा विसर पडला आणि टॉस झाल्यानंतर बेन स्टोक्सला शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला. त्यानंतर बेन स्टोक्सने शेकहॅंड करण्याऐवजी हाताची मुठ्ठी बंद करुन हात पुढे केले. त्यानंतर जेसन होल्डरला अचानक आयसीसीचा नियम आठवला आणि मैदानावरील कॅमेरामन आणि समालोचक देखील हसू लागले.

या सामन्यात पाऊस सतत व्यत्यय आणत होता. आऊटफिल्ड ओले असल्यामुळे सामना तीन तास उशिराने सुरू झाला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ केवळ १७.४ षटकांचा झाला. मात्र, वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएल याने दमदार सुरुवात करत पहिल्याच षटकात डॉम सिब्ले याला त्रिफळाचीत करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. सात चेंडू फेकल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि सामना थांबवण्यात आला.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार खेळाडूंना सामन्यात सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच विकेट पडल्यानंतर अथवा शतक ठोकल्याने शेकहँड करता येणार नाही तसेच चेंडूला चमक आणण्यासाठी लाळ लावता येणार नाही. कसोटी सामना सुरू असताना एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याच्या ऐवजी पर्यायी खेळाडू निवडण्याची मुभा देखील आयसीसीने दिली आहे. हे नियम केवळ कसोटी क्रिकेटसाठी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---