आयपीएल टी-२० स्पर्धेला टी-२० स्वरूपातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या लीगमध्ये सर्व दिग्गज क्रिकेट खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंनाही एकत्र खेळण्याची संधी मिळते. ज्यामध्ये त्या युवा खेळाडूंना मोठ्या खेळाडूंकडून बरेच काही शिकायला मिळते.
आयपीएलचे सर्व संघ १९ सप्टेंबरपासून सुरू होणार्या आयपीएल-२०२० साठी युएईमध्ये पोहोचले आहेत. त्या सर्व संघांनी मैदानावर सराव सुरु केला आहे.
आयपीएलमध्ये बर्याच वेळा असे घडले की, चांगली कामगिरी करणारे खेळाडू ९० हून अधिक धावा करून नाबाद राहिले. तर आज या लेखात अशा ७ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे ९० पेक्षा जास्त धावा करूनही शतक न करता नाबाद राहिले.
१. शिखर धवन (Shikhar Dhawan)
सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आयपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याला टी-२० फॉर्मेटमध्ये खेळण्याचा खूप चांगला अनुभव आहे. शिखर धवनने सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना अनेकदा मोठ्या खेळी केल्या आहेत. पण त्या धावांचे शतकात रूपांतर करता आले नाही. कारण शतक ठोकण्यापूर्वी अनेकदा षटके संपली आहेत.
एकदा शिखर धवनला ९७ धावांवर नाबाद राहावे लागले. वास्तविक, या सामन्यात त्याने आपल्या संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली. पण या सामन्यात शतक न करता त्याला मैदानाबाहेर जावे लागले. आता तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल.
२. जोस बटलर (Jose Butler)
सन २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना जोस बटलर दोनदा ९० पेक्षा जास्त धावा करून नाबाद राहिला. तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही. त्याचप्रमाणे, तो चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ९५ धावांवर नाबाद होता, तर तो मुंबई इंडियन्स विरूद्ध ९४ धावांवर नाबाद राहून माघारी परतला.
जोस बटलर त्याच्या संघातील मोठा खेळाडू आहे. त्याची क्षमता अफाट आहे. इंग्लंडच्या संघातून बटलर चांगली कामगिरी करताना नेहमीच दिसला. आयपीएलमध्येही बटलरने आपली मोठी ओळख निर्माण केली आहे. जेव्हा जेव्हा त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत: ला सिद्ध केले आहे.
३. ख्रिस गेल (Chris Gayle)
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याचाच नावावर आहे. आतापर्यंत आयपीएलमधील १२५ सामन्यांत त्याने ३६९ चौकार तर ३२६ षटकार ठोकले आहेत.
मोठे आणि लांब फटाके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गेलने फलंदाजीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आरसीबी संघातून खेळात असताना गेलने २०१३ मध्ये एकदा मुंबई इंडियन्सविरुद्ध ९२ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतरही तो एखादा ९९ धावांवर नाबाद राहून शतकापासून केवळ १ धाव दूर राहिला.
४. विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार आणि आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटमध्ये ‘रन मशीन’ म्हणून ओळखले जाते. कारण त्याच्याकडे प्रत्येक स्वरूपात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. विराट कोहलीकडे भरपूर अनुभव आहे.
आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अद्याप आयपीएलचा एकही मोसम जिंकलेला नाही. पण अशी अपेक्षा आहे की आयपीएल २०२० च्या १३ व्या सत्रात आरसीबी संघ आपले नाव आयपीएल चषकावर कोरेल. पण त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील.
आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ९३ धावा फटकावल्या परंतु त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याआधी मुंबई इंडियन्सविरुध्द षटक संपल्याने ९२ धावांवर नाबाद राहून तो माघारी परतला होता.
५. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएलमध्ये १०४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २७२८ धावा केल्या आहेत. सेहवागची आयपीएल कारकीर्द खूप चांगली होती.
पण २००८ आणि २०१३ मध्ये शतक न करता त्याला मैदानाबाहेर जावे लागले. खरं तर, २००८ मध्ये त्याने दिल्ली संघासाठी नाबाद ९४ धावा फटकावल्या होत्या. त्याचप्रमाणे २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ९५ धावांची नाबाद खेळी खेळल्यानंतर षटक संपल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
६. शेन वॉटसन (Shane Watson)
शेन वॉटसन आयपीएलमध्ये विविध संघातून खेळला आहे. सध्या तो एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळताना दिसतो.
वॉटसनने आयपीएलसाठी अनेक सामने खेळले आहेत. त्याचा अनुभव आणि क्षमता पाहून आयपीएलमधील बहुतेक संघ त्याला आपल्या संघात ठेवू इच्छित आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना पुणे वॉरियर्सविरूद्ध नाबाद ९० धावांची खेळी केली आणि त्याआधी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ९८ धावा केल्या, या दोन्हीवेळा त्याला शतक पूर्ण करता आले नाही.
७. डेव्हिड वॉर्नर (David Warner)
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी चांगली होत आहे.
वॉर्नरने आयपीएलमध्ये तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे, तसेच त्याने आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले आहे. वॉर्नर एक उत्तम कर्णधार तसेच एक जबरदस्त फलंदाज देखील आहे. त्याने आयपीएलच्या प्रत्येक संघासमोर जबरदस्त फलंदाजी केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर दोनदा ९० पेक्षा जास्त धावा करून आपले शतक पूर्ण करू शकलेला नाही. एकदा त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ९० धावांची खेळी केली होती. त्याआधीही त्याने २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध ९३ धावांची नाबाद खेळी केली होती.