सोमवार दि.18 जून रोजी फिफा विश्वचषकासाठी रशियात असलेला सौदी अरेबियाचा संघ विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावला.
फिफा विश्वचषकाच्या अ गटातील पुढच्या सामन्यासाठी सौदी अरेबियाचा सेंट पिटर्सबर्गहून रोस्तव या शहरात ज्या विमानातून जात होते त्या विमानाच्या एका इंजीनला पक्षी धडकल्यामुळे पेट घेतला.
या अपघातात सौदी अरेबियाच्या कोणत्याही खेळाडूला इजा झालेली नाही. सर्व खेळाडू सुरक्षित असल्याची माहीती सौदी अरेबियाच्या संघव्यवस्थापनाने दिली.
2018 फिफा विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाच्या संघाल 5-0 असा पराभव यजमान रशियाकडून स्विकारावा लागला आहे.
बुधवार दि. 20 जूनला सौदी अरेबियाचा संघ उराग्वे विरूद्ध विश्वचषकातील दुसरा सामना खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!
–स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात