आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वयोमर्यादेचा एक नवीन नियम आणला आहे. हा नियमानुसार आता 15 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. हा नियम वरिष्ठ पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील संघांनाही लागू होतो.
खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम आणला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी कोणताही वयोमर्यादेचा नियम नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच खेळाडूचे वय पदार्पणावेळी 15 किंवा त्यापेक्षा जास्त आहे की नाही हे पाहिले जाईल.
आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘खेळाडूंची सुरक्षितता सुधारण्यासाठी आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी किमान वयाची मर्यादा घालण्याचे निश्चित केले आहे. 15 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार आहे. हा नियम पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील क्रिकेट असा सर्वांनाच तसेच सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांना लागू होत आहे.’
तथापि, आयसीसीने असेही म्हटले आहे की अपवादात्मक परिस्थितीतच एखाद्या संघाला वयाचे निकष न पाळणाऱ्या खेळाडूला खेळू देण्याची परवानगी मिळू शकते.
आत्तापर्यंत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये कसोटीचा दर्जा असणाऱ्या संघांमध्ये फक्त एकदाच 15 वर्षांखालील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. पाकिस्तानच्या हसन राझाने वयाच्या 14 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याव्यतिरिक्त रोमानियाच्या एम घेरासिम आणि कुवेतच्या भावसारने 14 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! श्रीलंकेचा ‘हा’ क्रिकेटपटू अडकला फिक्सिंगच्या जाळ्यात, आयसीसीकडून कडक कारवाई
‘आर्थिक फायद्यासाठी भारताला मिळतील सोप्या खेळपट्ट्या’, माजी पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त वक्तव्य
मोठी बातमी ! २०२२ मध्ये होणारी महिला टी२० विश्वचषक स्पर्धा स्थगित, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा