वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम हे भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. धावांची गोष्ट केली तर सचिन तेंडूलकर व विराट कोहलीने विक्रमांचा रतिब घातला आहे.
सचिन, विराट, गांगुली, द्रविड व धोनी अशा ५ भारतीय खेळाडूंनी वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर जगातील एकूण १४ खेळाडू असे आहेत ज्यांनी वनडेत १० हजार धावांचा हा टप्पा पार केला आहे.
परंतु सध्या खेळत असलेले काही खेळाडू असेही आहे ज्यांना १० हजार धावांचा टप्पा पार करता येऊ शकतो. यातील सर्वंच खेळाडू २००५ ते २००७ दरम्यान वनडे पदार्पण केले आहे. त्यामुळे १३ ते १६ वर्षांच्या वनडे कारकिर्दीनंतर ते हा विक्रम करु शकतात.5 current batsmen who can score 10,000 runs in ODIs Cricket.
एबी डिविलियर्स (वय ३६ वर्ष)
यात सर्वात पहिल नावं हे एबी डिविलियर्स असंच असेल. एबीने जरी क्रिकेटला अलविदा केला असला तरी हा ३६ वर्षीय स्टार खेळाडू कधीही कमबॅक करु शकतो. सध्या त्याच्या नावावर २२८ वनडेत ९५७७ धावा आहेत. त्याला केवळ ४२३ धावा या विक्रमासाठी कमी पडत आहेत. हा विक्रम केला तर जगात तो १५वा तर कॅलिसनंतरचा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा स्टार ठरेल.
रोहित शर्मा (वय- ३३ वर्ष)
या यादीतील दुसरं महत्त्वाचं नाव अर्थातच रोहित शर्मा. रोहितने वनडेत २२४ सामन्यात ९११५ धावा केल्या आहेत. गेली दोन वर्ष रोहित वनडेत वर्षात १ हजारांचा टप्पा सहज पार करतोय. त्यामुळे या वर्षीच तो हा विक्रम करण्याची शक्यता जास्त आहे. त्याला आता केवळ ८८५ धावांची यासाठी गरज आहे. असं केलं तर तो वनडेत १० हजार धावा करणारा ६वा भारतीय ठरेल.
राॅस टेलर (वय- ३६ वर्ष)
एकेकाळी प्रचंड आक्रमक असलेला परंतु आता आक्रमाला वेसण घालत धावा उभारणी करायला प्राधान्य देणाऱ्या ३६ वर्षीय टेलरलाही हा विक्रम करण्याची संधी आहे. टेलरने २००६मध्ये वनडे पदार्पण केल्यानंतर आजपर्यंत त्याने २३२ सामन्यात ८५७४ धावा केल्या आहेत. त्याला सध्या १४२६ धावा हा कारनामा करण्यासाठी लागत आहे. न्यूझीलंडकडून खेळताना आजपर्यंत एकाही खेळाडूला वनडे १० हजार धावा करता आलेल्या नाहीत.
ऑयन माॅर्गन (वय- ३३ वर्ष)
विश्वविजेता कर्णधार ऑयन माॅर्गनलाही वनडेत १० हजार धावा करण्याची संधी आहे. त्याने २००६ला आयर्लंडकडून वनडे पदार्पण केले असून सध्या तो इंग्लंडचा कर्णधार आहे. या काळात त्याने २३६ वनडे सामन्यात ७३६८ धावा केल्या आहेत. त्यालाही २६३२ धावांची सध्या गरज आहे. त्याने हा पराक्रम केला तर दोन देशांकडून खेळताना वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार करणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल.
तमिम इक्बाल (वय- ३१)
बांगलादेशचा स्टार फलंदाज तमिम इक्बालला वनडेत १० हजारांचा टप्पा पार करायला २७९८ धावांची गरज आहे. २००७ला वनडे पदार्पण केलेल्या तमिमने बांगलादेशकडून २०७ वनडेत ७२०२ धावा केल्या आहेत. जर त्याने हा कारनामा केला तर पहिलाच बांगलादेशी खेळाडू ठरेल ज्याने वनडेत १० हजारांचा टप्पा पार केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय
–जेन्हा सचिन विराटने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा घडले होते बाप योगायोग
-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य
-कोरोनाने १५०० पेक्षा जास्त जीव घेतलेल्या देशात फसले आयपीएल प्लेअरचे वडिल
-त्याच हाॅटेलमध्ये कनिका कपूर थांबली होती, जिथं होता आफ्रिका संघाचा मुक्काम