२५ ऑक्टोबर २०१८ला विशाखापट्टनमला विराटने वनडेत १० हजार धावांचा टप्पा पार केला होता. यासाठी त्याने दीडशतकी खेळी केली होती. विराटपुर्वी १० हजार धावांची कुणाची एवढी चर्चा झाली असेल तर ती अर्थातच सचिन तेंडूलकरची.
गमतीचा भाग म्हणजे जेव्हा त्यांनी या १० हजार धावा केल्या तेव्हा अनेक विक्रम तर झालेच शिवाय दोघांच्या खेळीमधील विक्रमांमध्येही अनेक योगायोग होते. त्यातील काही योगायोग
काय आहेत ते खास योगायोग-
१. सचिनने ३१ मार्च २००१ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १२५ चेंडूत १३९ धावा करत १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटनेही २५ ऑक्टोबर २०१८ला विशाखापट्टनमला १२९ चेंडूत नाबाद १५१ धावा करत १० हजार धावांचा टप्पा गाठला. १० हजार धावा करताना शतकी खेळी करणारे विराट आणि सचिन हे दोनच खेळाडू आहेत.
२. जेव्हा सचिनने १० हजार धावांचा टप्पा पार केला होता त्या सामन्यात सचिनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. त्याचप्रमाणे १० हजारांचा टप्पा पार केलेल्या सामन्यात विराटलाही सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
३. सचिन आणि विराट दोघांनीही १० हजार धावांचा टप्पा भारतातच पार केला. सचिनने हा टप्पा इंदोरला तर विराटने विशाखापट्टनमला पार केला.
४. जेव्हा सचिनने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा कमी डावात १० हजार धावा करणारा तसेच वन-डेत १० हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू होता. तर विराटने जेव्हा हा टप्पा पार केला तेव्हा कमी डावात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.
५. सचिनने ज्या मैदानावर १० हजार धावा केल्या त्याच मैदानावर विराटला ही कामगिरी करण्याची संधी होती. परंतु काही कारणास्तव हा सामना इंदोरवरुन विशाखापट्टनमला हलविण्यात आली.
६. सचिनने जेव्हा १० हजार धावांचा टप्पा पार केला होता तेव्हा त्याची वन-डेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १८६ होती तर विराटने जेव्हा हा टप्पा पार केला तेव्हा त्याची धावसंख्या १८३ आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य
-कोरोनाने १५०० पेक्षा जास्त जीव घेतलेल्या देशात फसले आयपीएल प्लेअरचे वडिल
-त्याच हाॅटेलमध्ये कनिका कपूर थांबली होती, जिथं होता आफ्रिका संघाचा मुक्काम