डब्लिन। भारत विरुद्ध आयर्लंड संघात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 76 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने अर्धशतके करत महत्त्वाची कामगिरी बजावली.
याबरोबरच रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित 10,000 धावा पूर्ण करण्याचा मोठा टप्पा गाठला. हा टप्पा पार करणारा तो भारताचा 13 वा क्रिकेटपटू आहे.
या सामन्यात रोहितचे टी20तील तिसरे शतक फक्त 3 धावांनी हुकले. तो 61 चेंडूत 97 धावांवर बाद झाला. मात्र त्याने 10हजार धावांचा टप्पा पार केल्याने भारताच्या नावावरही एक मोठा विक्रम झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वाधिक फलंदाजांनी 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. या विक्रमात भारताने आॅस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. त्यामुळे आता या यादीत भारत आणि आॅस्ट्रेलिया विभागून अव्वल स्थानावर आहेत.
दोन्ही संघाच्या प्रत्येकी 13 खेळाडूंनी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
https://twitter.com/SherryPaaji/status/1012259030683848704
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक देशासाठी 10000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची संख्या:
13 – आॅस्ट्रेलिया / भारत
10 – विंडिज / पाकिस्तान
9 – इंग्लंड
8 – श्रीलंका
7 – दक्षिण आफ्रिका / न्यूझीलंड
2 – बांग्लादेश / झिम्बाब्वे
महत्त्वाच्या बातम्या:
–टी२०मध्ये ६००० धावा करणाऱ्या चौघा भारतीयांना त्याने एकाच सामन्यात तंबूत धाडले
–हिटमॅन रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार
–क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही