कोलकाता | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन रविवारी शेवटचा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये आजपर्यंत अनेक विक्रम होत आले आहे. परंतु आज एक हटके विक्रमाचीही नोंद झाली.
तो विक्रम म्हणजे आयपीएलच्या एका हंगामात ३५० धावा आणि १५ विकेट घेणारा सुनिल नारायण केवळ चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
त्याने या मोसमात १६ सामन्यात ३५७ धावा आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षीच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो २०वा तर गोलंदाजांच्या यादीत ८वा आहे.
यापुर्वी २००८मध्ये शेन वाॅटसनने (४७२ धावा आणि १९ विकेट), २०१२मध्ये ड्वेन ब्रावोने (३७१ धावा आणि १५ विकेट) तर त्याच वर्षी जॅक कॅलिसने (४०९ धावा आणि १५ विकेट) घेतल्या होत्या.
आयपीएलमध्ये ३५०+धावा आणि १५+विकेट्स घेणारे गोलंदाज
२००८- शेन वाॅटसन (४७२ धावा, १९ विकेट)
२०१२- ड्वेन ब्रावो (३७१ धावा, १५ विकेट)
२०१२-जॅक कॅलिस (४०९ धावा, १५ विकेट)
२०१८-सुनिल नारायण (३५७ धावा, १७ विकेट्स)@MarathiBrain @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi #IPL @BeyondMarathi— Sharad Bodage (@SharadBodage) May 25, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा
–शिखर धवनने हा विक्रम करत धोनीला टाकले मागे
–अखेर विराट कोहली म्हणाला सॉरी