आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला लागोपाठ दोन पराभव पत्करावे लागले असून संघ जवळपास स्पर्धेबाहेर गेलाय. साहजिकच भारतीय संघाची अशी कामगिरी टीकेचे कारण ठरत आहे. केवळ भारतच नाही तर इतर देशांचे क्रिकेटतज्ज्ञही भारतीय संघावर टीका करत आहेत. पाकिस्तानचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघातील खेळाडू प्रशिक्षक आणि कर्णधारावर खूश नसल्याचा दावाही अख्तरने केला.
भारतीय संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धचे साखळी फेरीतील पहिले दोन सामने जिंकले होते. यानंतर सुपर फोरमध्ये भारताने पाकिस्तान आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धचे सामने गमावले. या दोन्ही पराभवांमुळे संघाला अंतिम फेरी गाठणे जवळपास कठीण झाले आहे. या दोन्ही सामन्यातील संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे, त्याचबरोबर कर्णधार रोहितच्या निर्णयांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतेय.
भारतीय क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहते संघातील काही खेळाडूंच्या बदलीची मागणी करत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर मात्र वेगळाच सूर आळवला आहे. अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की,
“भारताने चूक करू नये. रोहित शर्माकडून नेतृत्व काढून घ्यायला नाही पाहिजे. रोहित शर्मा थोडा अस्वस्थ दिसत आहे. तो खेळाडूंवर ओरडताना दिसतोय. त्याने तीन सामन्यांत तीनदा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत.”
भारतीय संघात नाराजी असल्याचेही अख्तर म्हणाला. संघात सातत्याने बदल होत आहे याचा अर्थ संघातील वातावरण काहीसे ठीक नाही. मात्र, हा पराभव एक अर्थाने चांगलाही आहे. कारण, हा पराभव भारतीय संघासाठी वेक अप कॉल ठरू जेणेकरून संघ आगामी विश्वचषकासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“वर्ल्डकपमध्ये हाच संघ खेळणार”; रोहितने दिले संघनिवडीबाबत रोखठोक उत्तर
भारत हरला तरीही रोहित अव्वलच! सचिनला मागे टाकत ठरलाय ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
भारताच्या आशा जागृत ठेवणारी अफगाणिस्तान करणार पहिली फलंदाजी, वाचा प्लेइंग 11