---Advertisement---

तीन-तीन आयपीएल टीमचे कॅप्टन झालेले खेळाडू, दोन आहेत मराठी

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगभरातील सर्वांत मोठ्या आणि लोकप्रिय टी-20 लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, मात्र काही खेळाडूंनी तर तीन वेगवेगळ्या संघांचे कर्णधारपदही भूषवले आहे. नेतृत्वगुण, अनुभव आणि रणनीतीनुसार या खेळाडूंनी विविध संघांना मार्गदर्शन केले आहे.

1. कुमार संगकारा
श्रीलंकन दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज कुमार संगकारानं तीन वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व केलं आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) – 2010
डेक्कन चार्जर्स – 2011-2012
सनरायझर्स हैदराबाद – 2013

संगकारानं आपल्या शांत स्वभाव आणि तल्लख क्रिकेट बुद्धीमत्तेच्या जोरावर नेतृत्व केले, परंतु त्याच्या नेतृत्वाखालील संघ मोठे यश मिळवू शकले नाहीत.

2. महेला जयवर्धने
संगकाराच्या सोबतच महेला जयवर्धनेलाही तीन संघांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

किंग्ज इलेव्हन पंजाब – 2010
कोची टस्कर्स – 2011
दिल्ली डेअरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) – 2012

जयवर्धनेचा अनुभव संघासाठी अनेकवेळी उपयुक्त ठरला, मात्र तोही आपल्या संघांना मोठे विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही.

3. स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियन स्टार स्टीव्ह स्मिथनं तीन संघांचं नेतृत्व करताना दमदार प्रदर्शन केले.

पुणे वॉरियर्स इंडिया – 2012-2013
राजस्थान रॉयल्स – 2015, 201-20
रायझिंग पुणे सुपरजायंट्स – 2017 (संघाला अंतिम फेरीत पोहोचवले)

4. अजिंक्य रहाणे
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेनं देखील तीन संघांचं कर्णधारपद सांभाळलं आहे.

राजस्थान रॉयल्स – 2018-19
रायझिंग पुणे सुपरजायंट – 2017 (हंगामी कर्णधार)
कोलकाता नाईट रायडर्स – 2025*

5. श्रेयस अय्यर
भारतीय युवा खेळाडू श्रेयस अय्यर हा देखील तिन्ही संघांसाठी कर्णधार राहिला आहे.

दिल्ली कॅपिटल्स – 2018-19
कोलकाता नाईट रायडर्स – 2022-2024
पंजाब किंग्ज – 2025*

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---