पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ४६ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने १३ धावांनी जिंकला. चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड ठरला. त्याने या सामन्यात ९९ धावांची खेळी केली. मात्र, त्याचे शतक १ धावेने थोडक्यात हुकली.
ऋतुराजला टी नटराजनने १८ व्या षटकात बाद केले. ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) ५७ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये ऋतुराज ९९ धावांवर बाद होणारा पहिला खेळाडू नाही. यापूर्वी चार खेळाडू ९९ धावांवर बाद झालेत. या लेखातही आपण अशा या चार खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
१. विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये सर्वात पहिल्यांदा ९९ धावांवर बाद झाला होता. तो २०१३ साली दिल्ली डेअरडेविल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध खेळताना ५८ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९९ धावा करून बाद झाला होता.
२. पृथ्वी शॉ
दिल्ली कॅपिटल्स संघातील युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचा (Prithvi Shaw) देखील या यादीत समावेश आहे. तो २०१९ आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना ५५ चेंडूत ९९ धावांवर बाद झाला होता. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले होते.
३. इशान किशन
मुंबई इंडियन्सचा युवा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) देखील ९९ धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे. तो आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळताना ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा करून बाद झाला होता. हा सामना अत्यंत रोमांचक झाला होता आणि बेंगलोरने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता.
४. ख्रिस गेल
या यादीतील चौथे नाव म्हणजे ख्रिस गेल. ‘युनिवर्सल बॉस’ अशी ओळख मिळवलेला ख्रिस गेल (Chris Gayle) आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध ९९ धावांवर बाद झाला होता. त्याने या खेळीदरम्यान ६ चौकार आणि ८ षटकार मारले होते.
(महत्त्वाची नोट – ख्रिस गेल, मयंक अगरवाल आणि सुरेश रैना ९९ धावांवर नाबाद राहिले आहेत.)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीरने जेंटलमन क्रिकेटच्या प्रतिमेला केले मलिन! विजयानंतर दिसला शिवीगाळ करताना
दिल्लीच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा मोहसिन खान आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर