क्रिकेटमध्ये धावा करणे जसे महत्त्वाचे तसे नाबाद रहात संघाला चांगल्या धावा उभारुन देणे किंवा सामना जिंकून देणेही महत्त्वाचे असते. ज्या संघात चांगले खेळाडू असतात त्या संघातील अनेक गोलंदाजांना फलंदाजीची संधी मिळत नाही. तसेच खालच्या फळीत खेळणारे फलंदाजही बऱ्याच वेळा नाबाद राहतात. अशी संधी फार कमी वेळा सलामीवीरांना किंवा पहिल्या ४ फलंदाजांना मिळते.
ज्या खेळाडूंना मॅच फिनीशर म्हणून जगात ओळख मिळालेली आहे त्यांनी अनेक सामन्यात संघाला नाबाद रहात संघाला एकहाती सामना जिंकून दिलेला असतो. कधी कधी काही फलंदाज हे सलामीला फलंदाजीला येत अगदी १० विकेट्ससाठीही फलंदाजी करुन नाबाद राहिले आहेत.
जे फलंदाज नाबाद राहतात त्यांची फलंदाजीची सरासरी ही कायम चांगली असते. याला कारण म्हणजे फलंदाजाची सरासरी ही त्याने केलेल्या धावांना त्याने खेळलेल्या डावाने भागुन मिळते. परंतु फलंदाज जेवढ्या डावांत बाद होणार नाही ते डाव भागताना विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे त्याची सरासरी वाढायला मदत होते. Batsmen with most number of not outs in international cricket, know where MS Dhoni stands in the list.
उदा. एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२६ डावात फलंदाजी करताना १७२६६ धावा केल्या. यात तो १४२ वेळा नाबाद राहिला. यामुळे धोनीची सरासरी ही १७२६६ धावांना ३८४ (५२६-१४२) डावांनी भागल्यावर येते ती अर्थात ४४.९६ होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद रहाणारे खेळाडू
१४२- एमएस धोनी, डाव- ५३६
१३५- जेम्स अॅंडरसन, डाव- २९५
११९- मुथय्या मुरलीधरन, डाव- ३२८
११३- शाॅन पोलाॅक, डाव- ३७०
१०८- चामिंडा वास, डाव- ३८४
१०४- स्टिव वाॅ, डाव- ५४८
ट्रेंडिंग घडामोडी-
-त्या ऐतिहासिक हॅट्रिकची प्लॅनिंग सांगताना शमी म्हणाला…
-एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
-भारताला १५ वर्षांपुर्वी त्रास देणाऱ्या आफ्रिदीच्या नावावर आजही तो विक्रम कायम