सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी दोन्ही डावात शतके झळकावण्याचा रेकाॅर्ड केला आहे, तर असे काही फलंदाज आहेत ज्यांनी एका डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात खातेही उघडले नाही. पण जर आपण जागतिक क्रिकेट कसोटीच्या इतिहासाबद्दल बोललो तर असे अनेक फलंदाज आहेत ज्यांनी एका डावात 150 पेक्षा जास्त धावा केल्या, परंतु त्याच डावात शून्यावर देखील बाद झाले.
या रेकाॅर्डच्या दृष्टीने जर आपण भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोललो, तर भारताकडूनही असे काही फलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारताचे 3 फलंदाज आहेत ज्यांनी एका डावात शून्य आणि एका डावात 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ज्यामध्ये युवा फलंदाज ‘सरफराज खान’चे (Sarfaraz Khan) नाव जोडले गेले. या बातमीद्वारे आपण भारतासाठी एकाच कसोटी सामन्यात 0 आणि 150 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
0 आणि 150 धावा सरफराज खान विरूद्ध न्यूझीलंड (2024)- भारताचा युवा फलंदाज सरफराज खानने (Sarfaraz Khan) न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. भारत-न्यूझीलंड संघातील पहिल्या कसोटी सामन्यात सरफराजला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. पण बेंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने 195 चेंडूत 150 धावा केल्या दरम्यान त्याने 18 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार ठोकले. कसोटी सामन्यात एका डावात शून्य आणि 150 पेक्षा जास्त धावा करणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला.
152 आणि 0 नयन मोंगिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दिल्ली (1996)- भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज नयन मोंगियाने आपल्या फलंदाजीने फारसा प्रभाव पाडला नाही, परंतु 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. मोंगियाने त्या सामन्यात 152 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.
0 आणि 163* माधव आपटे विरूद्ध वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन (1953)- भारताचे माजी दिग्गज खेळाडू माधव आपटे हे स्वातंत्र्यानंतर भारतीय क्रिकेट संघात खेळले आहेत. त्यांनी 1952 मध्ये करिअरमध्ये पदार्पण केले आणि 1953 मध्ये एक खास रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. एका डावात शून्य धावा आणि एका डावात 150 हून अधिक धावा करणारा माधव आपटे हा पहिला भारतीय फलंदाज आहे.
हेही वाचा-
VIDEO; पंतचा 107 मीटर लांबीचा गगनचुंबी षटकार पाहून चाहते थक्क!
IND vs NZ; खराब खेळीनंतर ‘या’ स्टार खेळाडूवर चाहते भडकले, बाहेर काढण्याची केली मागणी!
नव्या चेंडूनं केला टीम इंडियाचा गेम! न्यूझीलंडनं असा पलटवला सामना…