रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा आयपीएल क्रिकेटच्या इतिहासातील कागदावर दिसणारी सगळयात तगडा संघ, परंतु अजूनही आयपीएल जिंकण्यात अपयशी. बेंगलोर संघाने अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात मोठमोठी बोली लावून समाविष्ट करून घेतले. परंतु त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी न करता आल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं आणि मग नंतर ते खेळाडू ज्या संघात गेले त्या संघांनी आयपीएलचे विजेतपद पटकावत इतिहास रचला. तर दोस्तांनो आज आपण असे 5 खेळाडू बघणार आहोत ज्यांनी बंगलोर सोडल्यावर आपल्या संघाला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
१)क्विंटन डीकॉक- जोहान्सबर्गचा 28 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरवात 2013 साली केली. आतापर्यंतच्या 8 वर्षाच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 72 सामने खेळले असून 31.55 च्या सरासरीने 2114 धावा काढल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. एका हंगामात क्विंटन डी कॉक हा बंगलोर संघाचा हिस्सा होता, परंतु जास्त प्रभावी न ठरल्यामुळे त्याला आरसीबीने मुक्त केले आणि नंतर तो मुंबई इंडियन्स सोबत जोडल्या गेला. व मुंबईने आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली.
२)शेन वॉटसन- ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरवात 2008 पासूनच केली होती. आतापर्यंत 12 वर्षात त्याने एकूण 145 सामने खेळले आणि 30.99 च्या सरासरीने एकूण 3874 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. एका आयपीएल हंगामात आरसीबी संघाचा हिस्सा असलेल्या वॉटसनला आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे नंतर तो चेन्नई संघात दाखल झाला आणि चेन्नईला आयपीएल जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. चेन्नईव्यतिरिक्त वॉटसन आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स या विजयी संघाचा हिस्सा राहिलेला आहे.
३)मनीष पांडे- कर्नाटकचा 31 वर्षीय भारतीय फलंदाज मनीष पांडेने देखील आपली आयपीएल कारकीर्द 2008 पासूनच सुरू केली आहे. तेव्हापासून आतापर्यंतच्या 13 वर्षाच्या कालावधीत त्याने 30.36 च्या सरासरीने एकूण 3461 धावा केल्या आहेत. ज्यात 1 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. एका हंगामात पांडेदेखील विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबी च्या संघाकडूम खेळत होता. परंतु त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला नारळ दिला गेला. आणि नंतर हैद्राबाद संघात दाखल होऊन त्याने 2016 साली पहिल्यावहिल्या आयपीएल विजयात मोलाची कामगिरी बजावली होती.
४)युवराज सिंग- भारताचा महान माजी अष्टपैलू खेळाडू षटकारांचा बादशहा युवराज सिंग पहिल्या हंगामापासूनच आयपीएलशी जोडला गेलाय. या स्पर्धेत युवराजने 132 सामन्यांत 24.77 च्या सरासरीने एकूण 2750 धावा केल्या आहेत. ज्यात 13 शानदार अर्धशतकांचा देखील समावेश आहे. या दिग्गज खेळाडूला आरसीबीने सर्वात महागडी बोली लावून आपल्या संघात घेतले होते, परंतु तो त्या वर्षी आपली प्रतिभा दाखवू शकला नाही. त्यामुळे नंतर तो पुढच्या हंगामात मुंबईकडून खेळला आणि मुंबईने आयपीएल ट्रॉफी नावावर केली.
५)जॅक कॅलिस- दक्षिण आफ्रिकेचा सार्वकालिक महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस 2008 पासून 2014 पर्यंत आयपीएलचा भाग राहिलेला आहेत. आपल्या पहिल्या हंगामात तो बंगलोर संघाचा हिस्सा होता. परंतु तो हंगाम पूर्ण संघासाठी खराब गेला. बंगलोरला सोडल्यानंतर कॅलिस कोलकत्यासोबत जोडला गेला आणि 2014 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाने आयपीएल किताब पटकावला. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने ९८ सामने खेळले आहेत व फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर जुळ्या बंधूंनी गाजवले होते अधिराज्य; साजरा करत आहेत ५६ वा वाढदिवस
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज, अव्वल स्थानी आहे ‘हा’ दिग्गज
कसोटी जर्सी भारतीय खेळाडूंना वाटप करताना का घातले होते मितालीने पॅड्स, स्वत:च केला खुलासा