भारत आणि वेस्ट इंडिज संघामधील तीन सामन्यांच्या टी२० मालिका(IND vs WI T20) सुरु आहे. या दोन संघांमधील शेवटचा सामना रविवारी(२० फेब्रुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत आधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघाला(team india) क्लीन स्वीपची संधी आहे. याअगोदर खेळलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला होता. शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात ५ मोठे विक्रमही होणार आहेत. या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे या सामन्यात मोठा विक्रम करू शकतात.
युझवेंद्र चहल
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल त्याच्या कारकिर्दीतील ६६ विकेट घेण्यापासून एक विकेट दूर आहे. तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विकेटसह सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. आजच्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली तर तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा ६६ विकेटचा विक्रम मोडेल.
रोहित शर्मा
रोहित शर्मा अर्धशतक ठोकताच ३१ वेळा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करण्याचा विक्रम करेल. या बाबतीत तो माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडेल. सध्या रोहित आणि कोहलीने ३०-३० वेळा अर्धशतकी खेळी खेळली आहे.
भुवनेश्वर कुमार
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी हा सामना तिन्ही फॉरमॅटमधील (कसोटी, एकदिवसीय, टी२०) कारकिर्दीतील २०० वा सामना खेळणार आहे. सध्या भारतीय संघातील तिन्ही फॉरमॅटमध्ये ६६४ सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
कायरन पोलार्ड
रविवारच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्डने षटकार लागवला तर त्याचे षटकारांचे शतक पूर्ण होईल. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० षटकार मारणारा तो आठवा खेळाडू ठरु शकतो. सध्या न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल १६५ षटकारांसह प्रथम क्रमांकावर आहे.
विराट कोहली
विराट कोहली २ चौकार मारताच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३०० चौकार पूर्ण करेल. अशाप्रकारे टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. सध्या आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग ३१२ चौकारांसह अव्वल स्थानावर आहे. विराट कोहली २९८ चौकारांसह दुसऱ्या स्थानावर तर रोहित शर्मा २९० चौकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या-