मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात पाऊल ठेवताच नावावर खास विक्रम केला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरताच रोहितने भीमपराक्रम रचला. तो अशी कामगिरी करणारा एमएस धोनी याच्यानंतरचा दुसराच भारतीय ठरला.
रोहितचा विक्रम
झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Chellengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, मुंबई इंडियन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन मैदानावर आले. यावेळी रोहितने मैदानावर पाऊल ठेवताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
कर्णधार म्हणून 200वा टी20 सामना
कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माचा हा 200वा टी20 सामना ठरला. कर्णधार म्हणून 200 टी20 सामने खेळणारा रोहित भारताचा दुसरा, तर एकूण तिसरा फलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांचे नेतृत्व करताना 200 सामने खेळले. कर्धार म्हणून सर्वाधिक टी20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय संघाचा यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) पहिल्या स्थानी आहे. धोनीने आतापर्यंत कर्णधार म्हणून 307 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्स, भारत, इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व केले आहे.
दुसऱ्या स्थानी हा खेळाडू
याव्यतिरिक्त कर्णधार म्हणून 200 किंवा अधिक टी20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा खेळाडू डॅरेन सॅमी आहे. त्याने कर्णधार म्हणून 208 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने पेशावर जालमी, राजशाही किंग्स, सेंट लुसिया, सेंट लुसिया स्टार्स, सेंट लुसिया झौक्स, सनरायझर्स हैदराबाद, टायटन्स, वेस्ट इंडियन्स, वेस्ट इंडिज, वेस्ट इंडिज इलेव्हन, विंडवर्ड आयलंड या संघांचे नेतृत्व केले.
कर्णधार म्हणून 200 किंवा अधिक टी20 सामने खेळणारे खेळाडू
307 – एमएस धोनी
208 – डॅरेन सॅमी
200* – रोहित शर्मा
https://twitter.com/IPL/status/1642535739278913543
सामन्यातील रोहितची धावसंख्या
रोहित शर्मा याच्या सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने यादरम्यान 10 चेंडू खेळून फक्त 1 धाव काढत चाहत्यांनाही निराश केले. त्याच्याव्यतिरिक्त ईशान किशन हादेखील 13 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. तसेच, 17.50 कोटींचा खेळाडू कॅमरून ग्रीन याला 4 चेंडूत 5 धावाच करता आल्या. मुंबईने 6 षटकात 3 विकेट्स गमावत 29 धावा केल्या होत्या. (Players with 200 T20 matches as captain rohit sharma playing 200th match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीच्या सामन्यात सनरायझर्सचा सूर्यास्त! 72 धावांनी विजय मिळवत राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात
सनरायझर्सला बोल्टचा झटका! खाते न खोलू देता हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत, पाहा व्हिडिओ