वनडे क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळणे तशी नक्कीच सोप्पी गोष्ट नाही. सातत्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच ही संधी मिळते.
जगात वनडेत २६११ खेळाडूंनी एकतरी वनडे सामना खेळला आहे. यातील केवळ २१ खेळाडूंनी ३०० किंवा अधिक सामने खेळले आहे. यात ३०० किंवा अधिक वनडे सामन्यांच्या क्लबमध्ये शेवटचं नाव जे आलंय ते ख्रिस गेलचं.
त्याने २०१९मध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळला होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक अर्थात ४६३, माहेला जयवर्धने (४४८), सनथ जयसुर्या (४४५) आणि कुमार संगकारने ४०४ वन-डे सामने खेळले. अन्य कोणत्याही खेळाडूला ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळता आले नाहीत.
याचाच अर्थ श्रीलंकेच्या तब्बल ३ खेळाडूंनी ४०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
या यादीत सचिन ४६३, एमएस धोनी ३५०, द्रविड ३४४, अझरउद्दीन ३३४, गांगुली ३११ आणि युवराज सिंग ३०४ हे भारतीय खेळाडू आहेत.
३०० हुन अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशांची यादी-
७- श्रीलंका
६- भारत
३- पाकिस्तान
२- दक्षिण आफ्रिका
२- ऑस्ट्रेलिया
१- वेस्ट इंडिज
या खेळाडूंची ३०० वन-डे सामने खेळण्याची संधी हुकली-
२९९- ब्रायन लारा
२९५- मार्क बाऊचर
२९५- डेनियल विटोरी
२८८- मोहम्मद युसुफ
२८७- अॅडम गिलख्रिस्ट
या खेळाडूंना आहे वन-डेत ३०० सामने खेळण्याची संधी-
२८७- शोएब मलिक
२४८- विराट कोहली
२३६- ऑयन माॅर्गन
२३५- उपुल तरंगा
२३२- राॅस टेलर