भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (india tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी जोरदार विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर पार पडणार आहे. मालिका जिंकण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. चला तर पाहूया कशी असेल या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हन.
भारतीय संघातील खेळाडूंनी पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात बदल करण्याची शक्यता खूप कमीच आहे. जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात देखील मयंक अगरवाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात.
तसेच पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॉप ठरलेल्या चेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. परंतु या कसोटी सामन्यात जर तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, तर त्याचे तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे जवळ जवळ अशक्य आहे. तर चौथ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) असणार आहे. विराट कोहली देखील शतक झळकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तसेच पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे असेल यात काही शंका नाही. कारण पहिल्या कसोटी सामन्यात त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती. तर यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत भारतीय संघात असेल. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिली जाऊ शकते. तर गेल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केलेल्या मोहम्मद सिराजला, मोहम्मद शमीला आणि जसप्रीत बुमराहला वेगवान गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते.
अशी असेल दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हन (playing 11 for second test against South Africa)
मयंक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या :
दुसऱ्या कसोटीपूर्वी द्रविडने रहाणे-पुजाराच्या फॉर्मविषयी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
विराट माध्यमांसमोर कधी येणार ? प्रशिक्षक द्रविड यांनी दिले ‘हे’ उत्तर
हे नक्की पाहा :