दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज इमरान ताहिरने आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, सीएसकेकडून खेळत होता तेव्हा त्याच्या अंगावर काटा येत होता. त्याला येथे परिवाराप्रमाणे वाटत होते. अशाप्रकारचे वातावरण इतर कुठेही पहायला मिळाले नाही.
चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ताहिरने (Imran Tahir) सांगितले की, “मी जेव्हाही सीएसकेकडून खेळलो, तो प्रत्येक सामना रोमांचक होता. ही खूप विशेष भावना आहे. आम्ही एक संघ म्हणून खूप चांगले खेळत होतो.”
तीन वेळा आयपीएलचे (IPL) विजेतेपद पटकाविलेल्या सीएसके संघाबद्दल ताहिर म्हणाला की, “आम्ही जितके चांगले खेळू शकत होतो तितके चांगले खेळण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच सीएसकेसाठी अधिकाधिक सामने जिंकण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही एकमेकांच्या चांगल्या कामगिरीचा आनंद घेत होतो. त्यामुळे ही गोष्ट सीएसकेला विशेष बनवत होती.”
ताहिर पुढे म्हणाला की, “ज्या दिवशी मला सीएसके संघात सामील केले, तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या क्षणांपैकी एक क्षण होता. मला माहिती नव्हते की, मी विशेष लोकांबरोबर खेळण्यासाठी आणि विशेष संघात सामील होत आहे.”
ताहिरने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५५ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २०.३९ च्या सरासरीने एकूण ७९ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची एबीला थेट कर्णधारपदाची ऑफर?? एबी म्हणतो…
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू