---Advertisement---

ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद! रबाडाचे आयपीएलबद्दल मोठे भाष्य; म्हणाला, ‘भारतीयांच्या कमजोरीविषयी…’

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 7:23 PM
Kagiso-Rabada
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी20 स्पर्धा आहे. यामध्ये जगभरातील अनेक खेळाडू सहभाग घेऊन आपला जलवा दाखवत असतात. या स्पर्धेत खेळल्यामुळे खेळाडूंना इतर खेळाडूंविषयी माहिती होते. याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना होतो. असाच फायदा आता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यालाही झाला आहे. रबाडाचा असा विश्वास आहे की, आयपीएलमध्ये खेळल्याने भारतीय क्रिकेटपटूंबद्दल माहिती घेण्यास मदत होते, त्यामुळे राष्ट्रीय संघाकडून खेळताना त्यांच्याविरुद्ध सहजरीत्या खेळता येते. सध्या रबाडा भारतीय संघाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळत आहे.

पहिल्या वनडे सामन्यापूर्वी काय म्हणाला रबाडा?
वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भाष्य केले होते. यावेळी तो म्हणाला की, “मी नशीबवान आहे की, मला आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वीची तयारी करण्यासाठी मला मदत मिळते. आम्ही अनेक खेळाडूंसोबत आणि त्यांच्याविरुद्ध खेळतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या संघासोबत शेअर करणे सोपे होते.”

पुढे बोलताना रबाडा म्हणाला की, “विश्लेषण करण्यात आले आहे आणि असे केलेच पाहिजे.” या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात रबाडा दक्षिण आफ्रिका संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीचे नेतृत्व करणार आहे. तो म्हणाला की, “टी20 आणि वनडे क्रिकेट एकसारखेच आहे, फक्त वनडे हे याचा दीर्घ प्रकार आहे. आपली रणनीती समान असते आणि निश्चितरीत्या टी20च्या तुलनेत वनडेत कमी दबाव असतो. मात्र, मी असे म्हणेल की, प्रक्रिया ही दोन्ही ठिकाणी सारखीच आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kagiso Rabada (@rabada_25) 

रबाडाने आयपीएलमध्ये ‘या’ संघांचे केलंय प्रतिनिधित्व
आयपीएलमध्ये कागिसो रबाडा याने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या संघांकडून खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 63 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 8.26च्या इकॉनॉमी रेटने 99 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 21 धावा देत 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. आता रबाडा भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटला काळीमा फासणारी बातमी! आयपीएलच्या प्रसिद्ध खेळाडूला विमानतळावरून अटक, बला’त्काराचा आरोप

‘या’ भारतीय खेळाडूसाठी लकी ठरतयं 2022! टी20 पाठोपाठ वनडेत पदार्पण, वर्ल्डकपच्याही संघात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---