चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आज दुबईच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात अंतिम सामना खेळला जाणार आहे. तसेच भारत आणि न्यूझीलंड या सामन्यासाठी तयार आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकाही सामन्यात पराभव पत्करलेला नाही. भारतीय संघाने साखळी सामन्यात न्यूझीलंडचाही पराभव केला होता. आजच्या सामन्यात भारतीय संघ मजबुतीने मैदानात उतरेल. जर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच न्यूझीलंडचा घातक खेळाडू मैट हैनरी संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरी सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. रचीन रवींद्र आणि केन विलियमसन यांनी शतकी खेळी केली होती. या दोन्ही खेळाडूंची जागा न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये पक्की आहे. तसेच विल यंग सुद्धा मैदानात उतरू शकतो. डेरिल मिशेल आणि लाथम यांनाही अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.
न्यूझीलंड संघाचा शानदार खेळाडू मैट हैनरी उपांत्य फेरी सामन्यात दुखापती झाला होता. त्याचा खांद्याला मार बसल्यामुळे हेनरी अंतिम सामन्यातून बाहेर होऊ शकतो. याबद्दल अधिक कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जर हेनरी अंतिम सामन्यातून बाहेर पडला तर, त्याच्या जागी नाथन स्मिथला संघात स्थान मिळू शकते.
अंतिम सामन्यासाठी भारत न्यूझीलंड संघाची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूजीलंड : विल यंग, रचिन रवींद्र, केन विलियमसन, टॉम लैथम (यष्टीरक्षक), डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर (कर्णधार), काइल जैमीसन, विलियम ओरोर्के, मैट हेनरी/नाथन स्मिथ
हेही वाचा गतविजेता आरसीबी संघ डब्ल्यूपीएल स्पर्धेमधून बाहेर, यूपी वॉरियर्सकडून दारुण पराभव
भारत विरुद्ध न्यूझीलंड नॉकआउट संघर्ष, आकडे सांगतात धक्कादायक गोष्ट
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 3 भारतीय फलंदाज






