पुणे| भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिशन स्टेडियम, गहुंजे येथे वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून यात भारतीय संघाने इंग्लंडला पराभवाचे पाणी पाजले. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात निवड करण्यात आलेला संघात अनेक युवा आणि कमी अनुभव असणारे खेळाडू होते.
याबरोबरच कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा या २ खेळाडूंचे तर पदार्पण या सामन्यातून झाले. असे असतानाही भारतीय संघ इंग्लंड ला वरचढ ठरला.
त्यातही जर आपण सध्या संघाबाहेर असणाऱ्या किंवा पहिल्या सामन्यासाठी संघात संधी न मिळालेल्या; पण मागील काही काळापासून भारतीय संघाचा सातत्याने भाग राहत असलेल्या अशा खेळाडूंची यादी केली. तरी असे लक्षात येते की भारताचा आणखी एक मजबूत संघ तयार होऊ शकतो. तर आपण या लेखात असाच एक संघ तयार करून पाहू, ज्यात ते खेळाडू असतील जे इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात खेळले नाहीत.
सलामीवीर – शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ
शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ हे दोन युवा खेळाडू भारतीय संघाचे भविष्य मानले जातात. साल २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकातून नावारूपाला आलेल्या या दोन्ही युवा क्रिकेटपटूंना भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यात यश आले. शॉने २०२० साली वनडे पदार्पण केले होते, तर शूबमनने २०१९ साली वनडे पदार्पण केले. हे दोघेही मागील काही काळापासून भारतीय संघात जागा टिकवून आहेत. किंवा निदान त्यांची भारतीय संघात निवडीसाठी चर्चा होत राहते.
मधली फळी – सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिषभ पंत
सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिषभ पंत हे तिघेही मधल्या फळीत खेळू शकतात. ईशान आणि सूर्यकुमार यांनी नुकतेच इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. अद्याप त्यांचे वनडे पदार्पण झालेले नाही. पण त्या दोघांनीही आपल्या टी २० पदार्पणाच्या डावात छाप पाडली होती. या दोघांनीही अर्धशतके केली होती. तसेच रिषभ पंत मागील अनेक समन्यापासून शानदार फॉर्ममध्ये आहे.
अष्टपैलू खेळाडू – रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर
भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात उत्तम कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावलेला खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजा हा वनडे क्रमवरीमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. मात्र, सध्या तो दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. तसेच २१ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर हा देखील एक चांगला अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तसेच तो देखील मागील काही काळापासून भारतीय संघाचा नियमित भाग राहिला आहे. पण त्याने आत्तापर्यंत एकच वनडे सामना खेळला आहे.
गोलंदाज – जसप्रीत बुमाराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज
सध्या भारतीय संघात गोलंदाजांची कमी नाही. अनेक प्रमुख गोलंदाज सध्या दुखापती आणि इतर वयक्तिक कारणामुळे संघातून बाहेर आहेत. त्यात जसप्रीत बुमराह आणि शमी अशा गोलंदाजांचा समावेश आहे. हे दोघेही भारताच्या वनडे संघातील नियमित गोलंदाज आहेत. तसेच या दोघांनाही बराच अनुभव आहे. तसेच सिरजने देखील मागील काही सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. फिरकीपटू चहलला देखील मोठा अनुभव आहे. तो भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातील नियमित खेळाडू आहे.
राखीव खेळाडू – अक्षर पटेल,राहुल चाहर, टी नटराजन, दीपक चाहर, नवदीप सैनी
महत्त्वाच्या बातम्या-
आठवण ‘त्या’ सामन्याची, जेव्हा पाकिस्तानने बलाढ्य इंग्लंडला धूळ चारत उंचावला होता विश्वचषक
झक्कास! हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने लावले ब्लॅक स्विम सूटमध्ये ठुमके, पाहा व्हिडिओ
स्वत:चा खर्च स्वत: ते बबल टू बबल सुविधा, वाचा आयपीएलचे १० नवे नियम; खेळाडूंसह कुटुंबालाही बंधनकारक