भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत करत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला काहीवेळ विश्रांती करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू मस्ती करताना दिसून येत आहेत.
अशातच हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनीही पुल पार्टीचा आनंद घेतला आहे. याचे फोटोज् त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच नताशा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत बीसीसीआयने, खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नताशा आपला मुलगा अगस्त्यसह हार्दिकसोबत पुण्यात आहेत.
नताशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काळया रंगाचा स्विम सूट आणि काळया रंगाचा चष्मा घालून बॉलिवूड गायक जस्टिन बिबरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या बोल्ड व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.
मे महिन्यात अडकले होते विवाह बंधनात
नताशा आणि हार्दिक ने १ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी साखरपुडा केला होता. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यांनतर टाळेबंदीच्या काळात ३१ मे २०२० रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. यानंतर ३० जुलै २०२० रोजी या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या छोट्या पाहुण्याने प्रवेश केला होता. त्याचे नाव अगस्त्य असे ठेवण्यात आले होते.