भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल मागील अनेक महिन्यांपासून चर्चा होत आहे. त्याच्या भविष्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते मांडली आहेत. तसेच भारतीय संघाच्या जवळ असणाऱ्यांना अनेकदा धोनीच्या भविष्याबाबत प्रश्न विचारले जातात.
आता धोनी पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी20 विश्वचषकामध्ये सहभागी होणार आहे का असा प्रश्न बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला होता. यावर गांगुलीने ‘धोनीलाच विचारा’, असे उत्तर दिले आहे.
रविवारी(1 डिसेंबर) बीसीसीआयच्या 88 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकार परिषदेत जेव्हा एका पत्रकाराने गांगुलीला टी20 विश्वचषकात धोनीच्या सहभागाच्या संभाव्यतेबद्दल विचारले असता गांगुलीने थेट उत्तर दिले की “कृपया धोनीला विचारा.”
काही दिवसांपूर्वीच गांगुलीला धोनीच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गांगुलीने धोनीच्या भविष्याविषयी निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे, असे म्हटले होते. तसेच पुढील काही महिन्यांत सर्व काही स्पष्ट होईल आणि सर्वच गोष्टी सर्व गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येत नाहीत, असेही त्याने म्हटले होते.
त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धोनीनेही त्याच्या भविष्याबद्दल “जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका” असे सांगितले होते.
धोनी भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली आहे.
भारतात बनलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार हा सामना!
वाचा👉https://t.co/7HRklMZjO0👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 2, 2019
काल कर्नाटकला मोठे विजेतेपद मिळवून देणारा मनिष पांडे आज अडकला विवाहबंधनात!
वाचा👉https://t.co/BguUMZWAT0👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #MushtaqAliT20 #ManishPandey— Maha Sports (@Maha_Sports) December 2, 2019