---Advertisement---

भारताच्या या गोलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणार कर्णधार कोहली!

On: मंगळवार, डिसेंबर 3, 2019 11:53 AM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या वेगवान गोलंदाज उमेश यादववर खूश आहे. उमेशने मागील काही सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. गोलंदाजीबरोबरच त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीचीही झलक दाखवली आहे.

उमेशने भारताच्या मागील काही सामन्यांत खालच्या फळीत फलंदाजीला येत मोठी फटकेबाजी करीत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. उमेशचा ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचा पर्याय म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

उमेशनेही या संधीचा पुरेपुर उपयोग केला. उमेशने चार कसोटींमध्ये 13.65 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतले. त्याचबरोबर त्याने रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यात 10 चेंडूत 30 धावांची तुफानी खेळी केली होती. यामध्ये त्याने 5 षटकार मारले होते. त्यामुळे तो कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात जलद 30 धावा करणारा फलंदाज ठरला होता.

तसेच त्यानंतर त्याने इंदोर येथे 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 25 धावा केल्या होत्या.

त्याच्या या फलंदाजीवर खूश होत विराटने तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो असे गमतीने म्हटले आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीत विराट म्हणाला, ‘जरी हार्दिक परदेशात खेळण्यास तंदुरुस्त नसेल तरी आम्ही अद्याप पाच गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. आम्हाला यष्टीरक्षकासह आमच्या फलंदाजीचं सामर्थ्य माहित आहे.’

‘फिरकीपटूंमध्ये अश्विन आणि जडेजा हे देखील फलंदाजी करु शकतात. आमच्याकडे सातव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे आणि त्यानंतर उमेश यादव आहेच. उमेश आत्ता ज्या प्रकारे फलंदाजी करीत आहे, त्यानुसार त्याला पिंच हिटर म्हणून आपण तिसऱ्या क्रमांकावर खेळवू शकतो.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---