---Advertisement---

‘दोन कॅप्टन अन् एक किंग’, मोदींसह रोहित-विराट एकाच फ्रेममध्ये; पाहून भारतीयांची छातीही गर्वाने फुगली

Virat-Kohli-And-Rohit-Sharma-And-PM-Narendra-Modi
---Advertisement---

गुरुवारपासून (दि. 9 मार्च) सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मैदानावर हजेरी लावली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मैत्रीला ऐतिहासिक 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावर ऑस्ट्रेलियन कर्णधार अँथनी अल्बानीज भारतात आले होते. यावेळी त्यांनी होळी सणाचा आनंद लुटला आणि त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदारही बनले.

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये गणले जाणारे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांंच्यासोबत गोल्फ कारमध्ये स्टेडिअममध्ये चक्कर मारली. यादरम्यानचा क्षण पाहण्यासारखा होता. आपापल्या कर्णधारांना टोपी देऊन या सामन्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान उत्साही असल्याचे दिसले. इतकेच नाही, तर नाणेफेकीवेळी दोन्ही देशांच्या कर्णधारांसोबत पंतप्रधानही मैदानावर उतरले आणि राष्ट्रगीतामध्ये सहभाग नोंदवला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत उभे राहिले होते, तर त्याच्या बाजूला माजी कर्णधार विराट कोहली हादेखील दिसत आहे. विराटला क्रिकेटचा ‘किंग’ म्हणतात. तसेच, रोहित त्याच्या नेतृत्वामुळे सर्वत्र वाहवा मिळवत आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमाही अशीच काहीशी आहे.

काही युजर्सनी तिघांना एकाच फ्रेममध्ये पाहून ‘जादुई क्षण’ म्हटले. एका युजरने लिहिले की, “हा दिवसातील सर्वात शानदार क्षण आहे. संपूर्ण स्टेडिअम एकसुरात भारताचे राष्ट्रगीत गात आहे.”

https://twitter.com/Hydrogen_45/status/1633702595893010435?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1633702595893010435%7Ctwgr%5E68305f8bc301ad779d33a7ed21993d8f8d9b40ec%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fwatch-pm-modi-india-captain-rohit-sharma-cricket-king-virat-kohli-in-a-frame-fans-react%2Farticleshow%2F98513639.cms

आणखी एका युजरने ‘किंग्स एकसोबत’ असे लिहिले. तसेच, आणखी एकाने लिहिले की, “किती भारी फोटो आहे. राष्ट्रगीतावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्णधार रोहित शर्मा आणि किंग कोहली एकाच फ्रेममध्ये.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एकाने लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, रोहित शर्मा, विराट कोहली, खेळाडू आणि सर्व स्टेडिअम, जेव्हा राष्ट्रगीत म्हणतं. अंगावर शहारे आणणारा क्षण.”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघ आघाडीवर आहे. भारताने या मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे खूपच महत्त्वाचे आहे. (pm modi india captain rohit sharma cricket king virat kohli in a frame fans react see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---