क्रिकेटटॉप बातम्या

पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरुवात झाली. हा सामना भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या निर्णायक सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्टेडिअममध्ये हजेरी लावली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

खरं तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या क्रिकेटमधील मैत्रीला 75 वर्षे झाली आहेत. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (PM Anthony Albanese) यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अल्बानीज यांनी आपापल्या देशाच्या कर्णधारांना कसोटी कॅप दिले. तसेच, गोल्फ कार्टमध्ये बसून संपूर्ण मैदानाची चक्कर मारली. सोशल मीडियावर यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.

https://www.instagram.com/p/CpjcOCMIR-A/

नाणेफेक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्लेइंग इलेव्हमध्ये एक बदल केला. रोहितने संघाची घोषणा करत मोहम्मद सिराज याला विश्रांती देत त्याच्या जागी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला संधी दिली.

https://www.instagram.com/reel/CpjfNjdo06F/?utm_source=ig_web_copy_link

सामना पाहण्यासाठी पंतप्रधानांची हजेरी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतील हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील 75 वर्षांच्या मैत्रीला आणखी यादगार बनवत आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी स्टेडिअमच्या परिसरात मोठमोठे होर्डिंग्स लावले आहेत. होर्डिंग्सवर ’75 इअर्स ऑफ फ्रेंडशिप थ्रू क्रिकेट’ असेही लिहिले आहे.

होर्डिंग्समध्ये दोन्ही देशांच्या माजी आणि वर्तमानातील क्रिकेट दिग्गजांनाही दाखवण्यात आले. यादरम्यान भारताचे माजी खेळाडू आणि सध्याचे समालोचक रवी शास्त्री यांनी दोन्ही पंतप्रधानांना माजी आणि वर्तमानातील क्रिकेटपटूंबाबत सांगितले. त्यांचे फोटो सुंदर कोलाजमध्ये लावले गेले होते. इतकेच नाही, तर दोन्ही पंतप्रधानांनी राष्ट्रगीतापूर्वी सर्व खेळाडूंसोबत हातमिळवणीही केली. तसेच, खेळाडूंसोबत राष्ट्रगीतामध्येही सामील झाले.

मालिकेची स्थिती
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1ने आघाडीवर आहे. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. अशात भारत हा सामना जिंकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (pm narendra modi and australia pm anthony albanese ind vs aus 4th test match ahmadabad narendra modi stadium)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीतून सिराजचा पत्ता का झाला कट? कॅप्टन रोहितने सांगितले कारण
IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल

Related Articles