---Advertisement---

व्वा! काय दृश्य आहे… आयपीएलच्या स्टेडियममध्ये बसून चाहता मोबाईलवर पाहतोय पाकिस्तान-न्यूझीलंड सामना!

---Advertisement---

आयपीएल 2024 दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत आहे. ही स्पर्धा आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे कोणते संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील आणि कोणते संघ बाहेर पडतील लवकरच स्पष्ट होईल.

भारतात क्रिकेटचं किती वेड आहे हे सर्वांनाच ठावूक आहे. त्यातही आयपीएल म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. चाहते वेगवेगळ्या पद्धतीनं आयपीएलचा आनंद लुटत असतात. काहीजण सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात तर काहीजण मोबाईल आणि टीव्हीच्या माध्यमातून घरबसल्या सामन्याचा आनंद घेतात.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्टेडियममध्ये बसून मोबाईलवर पाकिस्तान-न्यूझीलंड सामना पाहत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आयपीएलची मॅच सुरू असताना मैदानात बसलेली एक व्यक्ती आपल्या मोबाईलवर पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळली जाणारी टी-20 मालिका पाहत आहे. त्या व्यक्तीचं संपूर्ण लक्ष पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत असलेल्या सामन्याकडे आहे. खरोखरच हा अत्यंत विलक्षण व्हिडिओ आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babarian♥️💜😊 (@umar.babria)

 

सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले असून, ज्यापैकी पाकिस्ताननं एक आणि न्यूझीलंडनं एक जिंकला आहे. तर एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मालिकेतील चौथा सामना 25 एप्रिल, गुरुवारी आणि पाचवा सामना 27 एप्रिल, रविवारी खेळला जाईल.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं 7 गडी राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं कमबॅक करत सामना 7 विकेटनं खिशात घातला. त्यामुळे आता चौथा आणि पाचवा सामना रोमांचक होईल यामध्ये काही शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

इरफान पठाणनं निवडला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ; हार्दिक पांड्याला स्थान, मात्र एका अटीवर…

रवींद्र जडेजाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती देणं चेन्नईलाच पडतंय महागात? कसं ते समजून घ्या

चेपॉकमध्ये लखनऊच्या एका चाहत्यानं केली चेन्नईच्या लाखो चाहत्यांची बोलती बंद; व्हिडिओ खूपच व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---