IPLक्रिकेटटॉप बातम्या

चेपॉकमध्ये लखनऊच्या एका चाहत्यानं केली चेन्नईच्या लाखो चाहत्यांची बोलती बंद; व्हिडिओ खूपच व्हायरल

आयपीएल 2024 चा 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईनं दिलेलं 211 धावांचं लक्ष्य लखनऊनं 19.3 षटकांत 4 गडी गमावून गाठलं.

आता या सामन्यातील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन्ही व्हिडिओंमध्ये लखनऊचे चाहते चेन्नईच्या चाहत्यांनी घेरलेले दिसतायेत. मात्र असं असूनही ते आपल्या संघाला जीव तोडून पाठिंबा देत ​​आहेत. एका व्हिडिओमध्ये लखनऊचा जबरा फॅन यलो आर्मीनं घेरलेला दिसतो. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा लखनऊची टीम विजयाच्या अगदी समीप आली होती. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, लखनऊचा एक छोटा चाहता चेन्नईच्या चाहत्यांनी घेरलेला दिसत होता. हा व्हिडिओ लखनऊच्या टीमनं त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.

 

 

आयपीएलचा 39 वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं 20 षटकांत 4 गडी गमावून 210 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं कर्णधाराला साजेशी खेळी खेळली. त्यानं 60 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 108 धावा केल्या.

प्रत्युत्तरात, लखनऊनं हे मोठं लक्ष्य 19.3 षटकांत चार गडी गमावून गाठलं. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसनं नाबाद शतक झळकावलं. त्यानं 63 चेंडूत 13 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 124 धावा केल्या. निकोलस पूरननं त्याला उत्तम साथ देत 15 चेंडूत 34 धावा ठोकल्या.

या विजयानंतर लखनऊची टीम 8 सामन्यांत 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात लखनऊचा संघ पराभूत झाला होता. परंतु त्यानंतर त्यांनी पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स विरुद्ध सलग तीन विजय मिळवले.

लखनऊची विजयाची मालिका दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पराभवानंतर खंडित झाली होती. परंतु त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा हा 8 सामन्यांतील चौथा पराभव ठरला. ते 8 अंकांसही गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

मार्कस स्टॉयनिसनं केलं चेन्नईला शांत! सीएसकेचा घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव

अंपायरच्या निर्णयावर नाखूष केएल राहुलचा संयम सुटला, मैदानावरच घातला वाद

चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक

 

Related Articles