IPLक्रिकेटटॉप बातम्या

अंपायरच्या निर्णयावर नाखूष केएल राहुलचा संयम सुटला, मैदानावरच घातला वाद

मंगळवारी (23 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात पुन्हा एकदा खेळाडू आणि अंपायरमध्ये वाद पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात विराट कोहलीनं बाद झाल्यानंतर अंपायरशी वाद घातला होता. यावेळी समोर होता लखनऊचा कर्णधार केएल राहुल.

झालं असं की, मार्कस स्टॉइनिसच्या चेंडूवर अंपायरनी रवींद्र जडेजाला पायचित बाद दिलं नाही. यानंतर केएल राहुलनं रिव्ह्यू घेतला. मैदानावरील पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतर टीव्ही अंपायरनंही जडेजाला नाबाद घोषित केलं. यानंतर केएल राहुल अंपायरशी वाद घालायला लागला.

चेन्नईच्या डावातील 8व्या षटकत ही घटना घडली. स्टॉइनिसच्या षटकातील 5वा चेंडू रवींद्र जडेजाच्या पॅडला लागला. स्टॉइनिसनं जोरदार अपील केलं. मात्र अंपायरनं बाद दिलं नाही, ज्यानंतर कर्णधार केएल राहुलनं रिव्ह्यू घेतला. बॉल ट्रॅकिंग यंत्रणेनं पाहिलं असता चेंडू लेग स्टंपवरून गेला होता. चेंडू इतका कसा उसळू शकतो हे राहुलला समजलं नाही. यानंतर त्यानं मैदानावरील पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

याच सामन्यात केएल राहुलनं अजिंक्य रहाणेचा उत्कृष्ट झेल घेतला. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नईच्या डावातील पहिल्याच षटकात चेंडू रहाणेच्या बॅटला लागला आणि कीपरच्या दिशेने गेला. राहुलनं क्षणात अतिशय नेत्रदीपक शैलीत उडी मारत हा झेल घेतला. रहाणे 3 चेंडूत केवळ 1 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह सीएसकेनं आपली पहिली विकेट अवघ्या 4 धावांत गमावली.

 

चेन्नई सुपर किंग्जनं या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 210 धावा केल्या. संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं शानदार शतक ठोकलं. तो 60 चेंडूत 108 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. शिवम दुबेनं 27 चेंडूत झंझावाती 66 धावा ठोकल्या. दुबेनं 3 चौकार आणि 7 षटकार लगावले.

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक

“मुंबई इंडियन्सकडून जास्त दिवस खेळाल तर डोक्याचा भुगा होईल”, माजी क्रिकेटपटूचं धक्कादायक विधान; पाहा VIDEO

“गेल्या 2-3 वर्षांत रोहितनंही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही”, सतत टीकेचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याला वीरेंद्र सेहवागची साथ

Related Articles