घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव टाळण्यासाठी खेळणार दिल्ली कॅपिटल्स, आज गुजरात टायटन्सचं आव्हान; जाणून घ्या प्लेइंग 11

आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात आज ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स समोर शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. गुजरातनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिल – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही चांगली विकेट दिसते. आम्ही गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग केला आहे. आयपीएलचे 100 सामने खेळणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खूप लांब पल्ला गाठला असून अजून लांबचा पल्ला गाठायचाय. परंतु लक्ष आजच्या सामन्यावर आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत – आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती. ही विकेट शेवटच्या गेमपेक्षा थोडी हळू दिसते. येथे दव एक मोठा घटक आहे. गेल्या वेळी दव नव्हतं. आशा आहे की आज रात्रीही ते नसेल. आमच्या संघात दोन बदल – डेव्हिड वॉर्नर बाहेर बसला. त्याच्या जागी होप आणि ललित यादवच्या जागी सुमित कुमार.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर
इम्पॅक्ट प्लेअर्स – शरथ बीआर, साई सुदर्शन, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अॅनरिक नॉर्किया, खलिल अहमद, मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुमित कुमार, रसिक दार सलाम, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव
आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत अपेक्षेप्रमाणं कामगिरी करू शकलेला नाही. दिल्लीनं चालू मोसमात आठ सामने खेळले असून त्यांना केवळ तीनच सामने जिंकता आले आहेत. दिल्लीनं आपल्या शेवटच्या तीनपैकी दोन सामने जिंकून पुनरागमनाची चिन्हं दाखविली आहेत, परंतु प्ले-ऑफसाठी पात्र होण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सची स्थितीही दिल्लीपेक्षा फार काही चांगली नाही. संघानं 8 सामने खेळले असून त्यांना 4 सामने जिंकण्यात यश आलं आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टायटन्सच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आलाय. परंतु संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 मध्ये कांगारू फलंदाज तुफान फार्मात! टी20 विश्वचषकासाठी सर्व संघांना धोक्याची घंटा!
व्वा! काय दृश्य आहे… आयपीएलच्या स्टेडियममध्ये बसून चाहता मोबाईलवर पाहतोय पाकिस्तान-न्यूझीलंड सामना!
इरफान पठाणनं निवडला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ; हार्दिक पांड्याला स्थान, मात्र एका अटीवर…