---Advertisement---

व्वाह रिषभ, भारी काम केलंस ! षटकारामुळे जखमी झालेल्या कॅमेरामनची पंतने मागितली माफी – पाहा व्हिडिओ

Rishabh Pant Apologized Camera Person
---Advertisement---

आयपीएल 2024 मधला 40 वा सामना काल (दि. 24 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स संघात झाला. अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना शेवटच्या चेंडूवर दिल्लीने आपल्या नावे केला. दिल्लीने हा सामना अवघ्या 4 धावांनी जिंकला. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने ह्या सामन्यात आपला क्लास दाखवत तुफान फलंदाजी केली. त्याबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

रिषभ पंतने गुजरात विरुद्ध 5 चौकार आणि 8 षटकार ठोकत 88 धावा केल्या. पंतच्या वादळी खेळीमुळे दिल्लीचा संघ 200 पार पोहोचू शकला. मात्र पंतच्या या वेगवान फलंदाजीदरम्यान एका षटकार थेट बीसीसीआयच्या कॅमेरामनला लागला. यात बिचारा कॅमेरामन जखमी झाला. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ( Rishabh Pant Apologized Camera Person Whom He Hit By His Six In Dc Vs Gt Match Ipl 2024 Watch Video )

परंतू सामना संपल्यावर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने जे केले त्यामुळे आता क्रिकेटप्रेमी सुखावले आहेत. पंतने त्याच्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रिषभ पंतने षटकार ठोकलेला चेंडू ज्या कॅमेरामनला लागला होता, त्याची सामना संपल्यावर भेट घेतली. सामना संपल्यानंतर पंतने त्या कॅमेरामनची माफी मागितली आणि तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली. पंतचा हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल होतोय.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---