भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी वाराणशी येथील डॉ.संपूर्णानंद क्रीडा स्टेडियमला भेट दिली आहे. नव्याने तयार होत असलेल्या स्टेडियम आणि क्रीडा संकुलची पहाणी करुन मोदींनी कामकाजाचा अढावा घेतला. मोदी आपल्या लोकसभा मतदार संघात मंगळवारी 18 जून रोजी पोहचले होते. वाराणशी मतदार संघातून मोदींनी सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2024 च्या निवडणुकी नंतर मोदींचा हा आपल्या मतदार संघात पहिलाच दाैरा होता.
वाराणशी दाैऱ्यावर असताना पंतप्रधान प्रथम काशी विश्वनाथ मंदिरला भेट दिली. यानंतर मोदी सिग्रा येथे बांधण्यात येत असलेल्या स्टेडियम आणि क्रीडा संकुलाला भेट देण्यासाठी रात्री अचानक पोहोचले. यावेळी त्यांनी त्याठिकाणी सुरु असलेल्या कामांची माहिती घेऊन आवश्यक ते निर्देशही दिले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. पीएम मोदींच्या स्टेडियमच्या निरीक्षणानंतर आता, अखेर कधी प्रर्यंत हा स्टेडियम पूर्णपणे तयार होईल? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
Reviewed the progress at the Dr. Sampurnanand Sports Stadium in Kashi. This stadium and sports complex will greatly help the youth of Kashi. pic.twitter.com/VJt82v6GfZ
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2024
सिग्रा येथे तयार होत असलेले क्रीडा संकुलला मोदी पोहचले तेव्हा आधिकाऱ्यांनी सांगितले पहिल्या टप्यातील कामपूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील कामकाज जुलै महिन्यांपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकूण 66782 स्के. फूट क्षेत्रावर तयार होत असलेल्या या स्पोर्टस काॅम्पलेक्स मध्ये इनडोअर आउटडोअर खेळांचे आयोजन होऊ शकते.
स्पोर्टस काॅम्पलेक्समध्ये क्रिकेट आणि फूटबाॅल साठी देखील स्टेडियम तयार होत आहे. 2024 पर्यंत क्रिकेट स्टेडियम काम पूर्ण होईल. अश्या स्थितीत 2025 मध्ये चाहते स्टेडियम मध्ये सामना पाहू शकतील. वाराणशी मध्ये तयार होत असलेला हा स्टेडियम उत्तर प्रदेशमधील तिसरे आंतरराष्ट्रीय असणार आहे. वाराणशीच्या आधी कानपूर आणि लखनउ हे दोन आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत.
वाराणशी मध्ये तयार होत असलेल्या स्टेडियम मध्ये भगवान शंकराची सावली दिसेल. मीडिया रिपोट्स नूसार, स्टेडियमचे छत अर्धचंद्राकार असणार आहे. तर स्टेडियमधील प्रेस बाॅक्स डमरुच्या आकाराचे असेल त्यासोबत प्रवेश द्वार बेलपत्रच्या आकारात असणार आहे. यामुळे चाहत्यांना आता सांस्कृतिक वातावरणात सामना पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचे नवे फिल्डिंग कोच? गौतम गंभीरशी काय चर्चा झाली?
क्रिकेटमधून होते करोडोंची कमाई, गाैतम गंभीरची एकूण संपत्ती जाणून व्हाल थक्क!
कर्णधार म्हणून विराट कोहलीपेक्षाही दुर्दैवी होता केन विल्यमसन! किवी चाहत्यांचं अनेक वेळा झालंय हर्ट ब्रेक