---Advertisement---

देशातील सर्वात सुंदर स्टेडियमचे होणार लवकरच उद्घाटन; पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये झाला खुलासा

On: रविवार, जानेवारी 30, 2022 4:55 PM
leh-ground
---Advertisement---

सध्या भारतामध्ये क्रिकेट क्षेत्रासाठी भारत सरकार अत्यंत भरीव कार्य करताना दिसत आहे. मागील वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धानंतर सरकारने आणखी काही स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० जानेवारी) झालेल्या आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांना एक आनंदाची खबर सांगितली.

काय म्हणाले पंतप्रधान
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घोषणा केली की, लडाखमध्ये तयार होणारे फुटबॉल स्टेडियम पूर्णत्वास आले आहे. लवकरच चाहत्यांना त्याची भेट मिळेल. ते ‘मन की बात’मध्ये म्हणाले, ‘आज मला लडाखबद्दल अशी माहिती तुमच्यासोबत सांगायची आहे, ज्याबद्दल तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. लडाखला लवकरच एक अप्रतिम खुले सिंथेटिक आणि ऍस्ट्रो टर्फ स्टेडियम मिळणार आहे.’

कोठे आहे हे स्टेडियम
डोंगरांच्या मधोमध बनवलेले हे सुंदर स्टेडियम लेहच्या स्पिटुकमध्ये आहे. फुटबॉल स्टेडियम समुद्रसपाटीपासून ११००० फूट उंचीवर बांधले गेले आहे. हे स्टेडियम खेलो इंडिया स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरचा एक भाग आहे. सुमारे २५०० प्रेक्षक बसण्याची तेथे क्षमता आहे. खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत लोकांसाठी विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने हा पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत या दुर्गम भागात हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. मागील वर्षी माजी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याचे फोटो शेअर केले होते. या फुटबॉल स्टेडियमसोबतच येथे हजार खाटांचे युथ हॉस्टेलही बांधले जात आहे. त्यानंतर हे देशातील सर्वात आकर्षक फुटबॉल प्रशिक्षण केंद्र आणि क्रीडा स्पर्धा केंद्र बनेल. कोरोनाचे आव्हान असतानाही हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण झाला.

महत्वाच्या बातम्या-

मला नाही वाटत तो कर्णधार बनेल; माजी भारतीय प्रशिक्षकाने नाकारली ‘या’ खेळाडूची दावेदारी (mahasports.in)

वयाच्या ३६ व्या वर्षी कार्तिकला करायचंय टीम इंडियात पुनरागमन; म्हटला, ‘मी फिनिशरची भूमिका पार पाडेल’ (mahasports.in)

अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे लाईन अप निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ दिवशी भिडणार भारत (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---