यापूर्वी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला एकेरी गटाच्या उपांत्य सामन्यात जागतिक अव्वल मानांकित चीनी ताईपेच्या ताय झू यिंगकडून २१- १८, २१-१२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. या पराभवामुळे सिंधू सुवर्णपदकाच्या स्पर्धेतून बाहेर पडली होती.

सिंधूपूर्वी कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले आहेत २ ऑलिंपिक पदकं?
विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकली होती. त्याने २००८ बीजिंग ऑलिंपिक्समध्ये ६६ किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर चार वर्षांनी २०१२ लंडन ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकले होते.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-सिंधूने रचला इतिहास! टोकियोत ‘कांस्य’ जिंकत दोन ऑलिंपिक पदकं मिळणारी बनली भारताची दुसरीच खेळाडू

सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधूला वडिलांचा पाठिंबा; म्हणाले, ‘पराभव विसरून…’

-खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय