पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. तसेच या वेळी भारतीय पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवाद साधला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील 117 खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने आपली जर्सी मोदींना भेट दिली. तर नेमबाज मनू भाकरने पंतप्रधानांना पिस्तूल भेट म्हणून दिले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. तर भारताची नेमबाज मनू भाकर हिनेही दोन कांस्य पदके पटकावली. मात्र, आता या पदकविजेत्या खेळाडूंव्यतिरिक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी लक्ष्य सेन, सरबजोत सिंग, मनू भाकर आणि श्रीजेश या खेळाडूंशी चर्चा केली. परंतु, भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज चोप्रा या सोहळ्याचा भाग नव्हता. सध्या नीरज चोप्रा यांची जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे. याच कारणामुळे तो या सोहळ्यात सहभागी होऊ शकला नाही.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंसोबतचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
#WATCH | PM Narendra Modi meets the Indian contingent that participated in #ParisOlympics2024, at his residence. pic.twitter.com/XEIs5tHrrI
— ANI (@ANI) August 15, 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 6 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 1 रौप्य पदकाशिवाय 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने एकमेव रौप्यपदक जिंकले. याशिवाय मिश्र नेमबाजी संघातील मनू भाकर व सरबजोत सिंग यांनी पदक जिंकले. मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय ठरली. भारतीय पथकातील एकमेव पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावत हा देखील पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. रायफल शूटर स्वप्नील कुसळे यानेही कांस्यपदक पटकावण्यात यश मिळविले. तर हॉकी संघ देखील सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकण्यात यशस्वी ठरला. यासोबतच भारताचे सहा खेळाडू विविध प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिले. तर, विनेश फोगट अपात्र त्यामुळे अंतिम सामना खेळू शकली नाही.
हेही वाचा-
सीएएसने अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट, फोटो पाहून तुमचेही हृदय तुटेल
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?