भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या अनेक भारतीय खेळाडूंशी ऑनलाइन चर्चा केली. याच दरम्यान नरेंद्र मोदींनी काही खेळाडूंना प्रश्न विचारले जे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. मोदींनी स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे आईस्क्रीमशी संबंधित जुने किस्सा मोदींनी या दरम्यान सर्वांसोबत शेअर केले. तसेच ऑलिंपिक जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी सिंधू समवेत आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली. आता लोक सिंधूची आईस्क्रीम स्टोरी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पीव्ही सिंधूसह पंतप्रधानांनी केली ही चर्चा
पंतप्रधान मोदींसोबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मोदी यांनी पीव्ही सिंधूला पहिल्यांदा तिच्या सरावविषयी विचारले. यानंतर मोदी म्हणाले, “मला अजूनही आठवते की, गोपीचंदजी एका मुलाखतीत म्हणाले होते की त्यांनी रिओ ऑलिंपिकपूर्वी तुमचा फोन काढून घेतला होता आणि त्यांनी तुला आईस्क्रीम खाण्याची परवानगी दिली नव्हती. तुला अजूनही आईस्क्रीम खाण्यास बंदी आहे का? समजले की तुला थोडी सवलत मिळाली?”
पीव्ही सिंधूने दिले उत्तर
पंतप्रधान मोदींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हसत पीव्ही सिंधू म्हणाली की, “मी अजूनही त्यावर नियंत्रण ठेवते. खेळाडूसाठी आहार खूप महत्वाचा असतो. आता ऑलिंपिक स्पर्धा आहे, त्यासाठी मी डायट कंट्रोल करीन, पण मी जास्त आइस्क्रीम खात नाही. मी फक्त कधीकधी खाते.” यावर मोदी म्हणाले, “मला खात्री आहे की तुला या वेळी नक्कीच यश मिळाले. यश मिळाल्यानंतर मला भेटायचं असेल तर मी तुझ्याबरोबर आईस्क्रीमही खाईन. ”
आईस्क्रीमचा काय होता पूर्ण किस्सा
खरं तर रिओ ऑलिंपिक 2016 च्या काही महिन्यांपूर्वी पीव्ही सिंधूचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी तिला आईस्क्रीम खाण्यास बंदी घातली होती. हे सिंधूच्या फिटनेससाठी केले होते. यासह त्यांनी सिंधूचा फोन देखील काढून घेतला होता. रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकून जेव्हा सिंधू परत आली तेव्हा गोपीचंद म्हणाले की सिंधू आता आईस्क्रीम खाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो ऑलिंपिकसाठी पीव्ही सिंधू सज्ज, स्पर्धेपूर्वी करुन घेतले खास नेल आर्ट, फोटो व्हायरल
डेव्हिड भाऊ जोरात! वॉर्नरने आता थेट अक्षय कुमारची केली नक्कल; म्हणाला, ‘सर्वात भारी कोणी केलंय?’
भारत दुसऱ्यांदा करणार बॅडमिंटन चॅम्पियनशीपचे आयोजन, ‘या’ वर्षी पार पडणार ही मोठी स्पर्धा