दक्षिण आफ्रिका येथे पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक पार पडला. रविवारी (29 जानेवारी) पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केले. भारतीय महिला संघाने कोणत्याही स्तरावर जिंकलेला हा पहिला क्रिकेट विश्वचषक आहे. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या पंतप्रधानांपासून अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी विजय संघाचे अभिनंदन केले.
भारतीय संघाने एकतर्फी या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर केवळ क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर लोकांनी भारतीय संघाचे कौतुक केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लिहिले,
Congratulations to the Indian Team for a special win at the @ICC #U19T20WorldCup. They have played excellent cricket and their success will inspire several upcoming cricketers. Best wishes to the team for their future endeavours. https://t.co/BBn5M9abHp
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
‘विश्वचषक जिंकलेल्या भारतीय महिला संघाचे अभिनंदन. त्यांचा हा खास विजय भविष्यात युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल. विजयी संघाला त्यांच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा.’
These Champs gave us a glimpse into the future…and that future looks dazzling! Jai Ho to these Warriors…???????????????????????? #U19T20WorldCup https://t.co/kmwzUUsM77
— anand mahindra (@anandmahindra) January 29, 2023
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लिहिले,
‘या विजेत्या मुलींनी भविष्यातील यशाची झलक दाखवली आहे. या मुलींचे भविष्य उज्वल आहे. जय हो, या योध्यांसाठी’
Big congratulations to the U-19 girls cricket team for winning the World Cup. Well done on making the nation proud???????? #JaiHind @bcciwomen @bcci
— Rohit Sharma (@ImRo45) January 29, 2023
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ट्विट करत म्हणाला,
‘विश्वचषक जिंकलेल्या अंडर 19 संघाचे अभिनंदन. तुम्ही देशाचा सन्मान वाढवला आहे.’
याव्यतिरिक्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, अनुभवी फलंदाज विराट कोहली तसेच अन्य आजी माझी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
पोचेस्ट्राम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टिटस साधू, पार्श्वी चोप्रा व अर्चना चोप्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर शफाली वर्मा, सौम्या तिवारी व गोंगडी त्रिशा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विजेतेपद ठरले.
(PM Narendra Modi Virat Kohli Rohit Sharma And Many More Congratulate Indias U19 Womens Cricket Team After T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या सामन्यात भारताने गमावली नाणेफेक, टीम इंडियापुढे मालिका हातात ठेवण्याचे आव्हान
U19 टी20 वर्ल्डकप: भारतीय मुली इतिहास रचण्याच्या नजीक; विश्वविजयासाठी केवळ 69 धावांचे आव्हान






