पुणे, 22 डिसेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन मिलिंद मारणे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा 23 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत भूगाव, पुना वेस्टर्न क्लब या ठिकाणी होणार आहे.
स्पर्धेत एकूण 50खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक मिलिंद मारणे यांनी सांगितले. (PMDTA Ratings Milind Marne Tennis Academy Bronze Series 2023 50 players participating)
महत्वाच्या बातम्या –
महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन । एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्लीची आगेकूच कायम
आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल पुरंदर, सारस हॉटेल संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश