पुणे। पीएमपी ग्रुप पुणे व स्टार क्रिकेट अकादमी यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमपी करंडक 14 वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंशुल हमपय्या( 8-15) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने रॉक 27 संघाचा 161 धावांनी दणदणीत पराभव करत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
धायरी स्टार स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने रॉक 27 संघाचा 161 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत दणदणीत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना रॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 50 षटकात 9 बाद 241 धावांचा डोंगर रचला. यात सक्षम कडलगने 7 चौकार व 1 षट्काराच्या मदतीने 79 चेंडूत 67 धावा केल्या. आठव्या गड्यासाठी सक्षम सक्षम कडलग(67 धावा) व अंशुल हमपय्या(24धावा)यांनी चेंडूत धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली.
241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंशुल हमपय्याच्या भेदक माऱ्यापुढे रॉक 27 संघाचा डाव केवळ 29 षटकात 80 धावांत संपुष्ठात आला. अंशुल हमपय्याने अफलातून गोलंदाजी करत केवळ 15 धावात 8 गडी बाद केले तर सक्षम कडलगने 19 धावांत 2 गडी बाद केले. 15 धावांत 8 गडी बाद करणारा अंशुल हमपय्या सामनावीर ठरला. स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक किशोर धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमपी ग्रुप पुणेचे निलेश धनकवडे आणि महाराष्ट्र रणजीपटू अक्षय दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी- 50 षटकात 9 बाद 241 धावा(सक्षम कडलग 67(79), अंशुल हमपय्या 24(56), शुभ श्रीवास्तव 24(30), अभिजीत पवार 15, आदित्य नारळे 2-28, यश महानवर 2-45, अवनिश गायकवाड 1-29, अथर्व काळभोर 1-45) वि.वि रॉक 27- 29 षटकात सर्वबाद 80 धावा(अवनिश गायकवाड 12(65), आदित्य कालटकर 26(57), अंशुल हमपय्या 8-15, सक्षम कडलग 2-19) सामनावीर- अंशुल हमपय्या
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 161 धावांनी सामना जिंकला.