विंडीजविरुद्ध पाचव्या टी२० सामन्यात विश्रांती घेतल्याने सूर्यकुमार यादवला मोठा झटका बसला आहे. आयसीसीच्या जाहीर झालेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार यादवची ११ अंकांनी घसरण झाली आहे. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना न खेळल्यामुळे बाबर आझमची नंबर १ची खुर्ची सुरक्षित झाली. फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दुसरीकडे, सूर्यकुमारला विंडीजविरुद्धच्या ५व्या टी-२० सामन्यातून विश्रांती देण्यात आल्याने तो जगातील नंबर वन फलंदाज होण्यापासून वंचित राहिला. तर दुसरीकडे रिषभ पंत, श्रेयस अय्यर या भारतीय फलंदाजांनी मात्र, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
गुणांचा फरक वाढला
सूर्यकुमार हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कायम राहिला आहे. मात्र, बाबर आझम आणि सूर्यकुमार यांच्यातील गुणांचे अंतर वाढले आहे. भारतीय फलंदाजाला ११ गुणांचे नुकसान झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध चौथा टी-२० सामना खेळल्यानंतर सूर्यकुमार ८१६ अंकांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता आणि तो लवकरच बाबर आझमला मागे टाकेल अशी अपेक्षा होती. जरी त्याचे स्थान घसरले नाही, परंतु आता गुण गमावल्यानंतर त्याचे ८०५ गुण झाले आहेत. तर बाबरचे ८१८ गुण असून दोघांमध्ये १३ गुणांचे अंतर आहे.
सूर्यकुमार टॉप-१० मध्ये एकमेव भारतीय फलंदाज
सर्वोच्च १० टी-२० फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील कामगिरीबद्दल बोलताना सूर्यकुमारने पहिल्या सामन्यात २४, दुसऱ्या सामन्यात ११, तिसऱ्या सामन्यात ७६ आणि चौथ्या टी-२० सामन्यात २४ धावा केल्या. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने विंडीजविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले, ज्यासाठी त्याला बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत बक्षीस मिळाले. अय्यरने ६ स्थानांनी झेप घेतली असून फलंदाजांच्या यादीत तो १९व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या मालिकेत एकूण ११५ धावा करणाऱ्या रिषभ पंतने ७ स्थानांची झेप घेतली आहे. सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे तर तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १३५ धावा केल्या होत्या, मात्र त्याला शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे बाबर आझमला मागे टाकण्याची संधीही त्याच्या हातातून गेली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विजय हजारे मुंबई खिलाडीज संघाचे करणार नेतृत्व
अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”