महाराष्ट्राचा माजी क्रिकेटपटू व भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विजय झोल याच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. क्रिप्टो करेन्सी व्यवहारातून एका उद्योजकाला धमकावल्याचा आरोप लावत विजय, त्याच्या भावावर तसेच अन्य साथीदारांवर घनसांगी पोलिसात तक्रार दाखल केली गेली. विजय हा प्रसिद्ध क्रिकेटपटू असून, शिवसेनेचे वरिष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचा जावई देखील आहे.
जालना येथील उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन विजयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल गुंतवणूक केली होती. परंतु, या करन्सीचे बाजार मूल्य घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरुन विजय आणि त्याच्या भावाने काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक घरी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी खरात यांनी केला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी विजय, त्याचा भाऊ विक्रम यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार कैलास गोरंट्याल यांनी विजय झोल व अर्जुन खोतकर यांना मोक्का लावावा अशी मागणी देखील केली. त्याचवेळी दुसरीकडे, खरात दांपत्यावर देखील जालनामध्ये 12 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विजय झोल हा महाराष्ट्र क्रिकेट संघाचा सलामीवीर म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसला आहे. त्याने महाराष्ट्रासह भारताच्या अंडर 19 संघाचे विश्वचषकातही नेतृत्व केलेले. शालेय क्रिकेटमध्ये मोठे विक्रम नावे केल्यानंतर तो प्रकाश़झोतात आलेला. 2012 अंडर 19 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. तसेच, 2014 अंडर 19 विश्वचषकात त्याने भारताचे नेतृत्व केलेले. त्याच्या नेतृत्वात खेळलेले संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव इत्यादी खेळाडू सध्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.
(Police Case Filed Against Former India U19 Cricket Team Captain Vijay Zol In Jalna)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश
‘या’ पक्षाने केली सूर्यकुमार यादवची नक्कल! संघसहकारी अर्शदीपही म्हणाला, ‘पाजी तुमची कॉपी…’