भारतीय चाहत्यांसाठी वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभव सहन करणे कठीण जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 6 विकेट्सने मात दिली. या पराभवानंतर चाहत्यांच्या मनाला मोठी ठेच पोहोचली. अशात भारतीय खेळाडूंवर चाहत्यांकडून टिका देखील केली गेली. क्रिकेटपटूंच्या घराबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस तैनात केले गेले.
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. उभय संघांतील ही लढत एकदर्फी झाल्याचे दिसले. स्पर्धेत एकही पराभव न स्वीकारता भारताने अंतिम सामन्यात स्थान पक्के केले होते. पण अंतिम सामन्यात यजमान भारताला पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर रविवारी सलग नववा विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियान संघ वनडे विश्वचषक स्पर्धेच्या सहावी ट्रॉफी उंचावण्यासाठी पात्र ठरला. दुसरीकडे भारताला इतिहिसातील तिसरा विश्वचषक जिंंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.
अंतिम सामन्यातील पराभव भारतीय खेळाडूंसह चाहत्यांची चांगलीच निराशा करणारा होता. अशात चाहत्यांकडून खेळाडूंच्या राहत्या घरी काही चुकिचा प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलिसांकडून आधीच घेतली गेली होती. एबीसी न्यूज या वृत्तासंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिनुसार कानपूरमध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या घराबाहेर काही पोलीस तैनात केले गेले होते.
#कानपुर– इंडिया का वर्ल्ड कप हारने के बाद कुलदीप यादव के घर की सुरक्षा के लिए पहुंची जाजमऊ पुलिस.
.
.@kanpurnagarpol @Uppolice #UttarPradesh #Kanpur #CWC2023Final #Worldcupfinal2023 #KuldeepYadav #Cricketer #LatestNews #abcnewsmedia pic.twitter.com/LADSDKVLO5— Abcnews.media (@abcnewsmedia) November 20, 2023
दरम्यान, कुलदीप अंतिम सामन्यात भारतासाठी एकही विकेट घेऊ शकला नाही. विश्वचषक स्पर्धेत केवळ दोन सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. इतर सर्व सामन्यांमध्ये त्याने संघासाठी महत्वाच्या विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 241 धावांचे लक्ष्य गाठले. (Police security was deployed outside Kuldeep Yadav’s house in Kanpur)
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023 । वॉर्नर अजून संपला नाही, निवृत्तीचा अंदाज वर्तवल्यानंतर दिग्गजाने एकदाचे स्पष्टच करून टाकले
मोठी बातमी! INDvsAUS Finalनंतर पोलिस अलर्टवर, ‘या’ भारतीय खेळाडूच्या घराबाहेर गस्त; लगेच वाचा