जेव्हाही भारतीय क्रिकेट संघ कुठल्या सामन्यात पराभूत होतो, तेव्हा चाहत्यांची नाराजी कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येत असते. अशात वातावरण जास्त तापू नये यासाठी पोलीसही काळजी घेत असतात. असेच काहीसे आयसीसी विश्वचषक 2023 अंतिम सामना भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर घडले. वातावरण बिघडू नये म्हणून भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव याच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त घातल्याचे वृत्त समोर येत आहे.
अशात भारताच्या पराभवानंतर खेळाडूंच्या घराबाहेर प्रेक्षकांनी नाराजी दाखवू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. कानपूर डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या घराबाहेर पोलीस निरीक्षक आणि हवालदारांनी गस्त घालायला सरुवात केली आहे. तसं पाहिलं, तर सामना गमावल्यानंतर कुलदीपच्या घरात शांतता पसरली आहे. घराच्या बाहेरही कुणी निघत नाहीये.
कुलदीपच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
मात्र, कुलदीपच्या घराबाहेर नाराज झालेल्या कोणत्याही चाहत्याने कायदा आणि सुव्यस्थेची समस्या करू नये, म्हणून पोलिसांनी आधीच घबरदारी घेतली आहे. कारण, दिवसा शहरातील अनेक क्रिकेटप्रेमी कुलदीपच्या घराबाहेर पोहोचले होते. यावेळी माध्यमंही सोबत होती.
पोलीस काय म्हणाले?
जाजमऊ ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद सिसोदिया यांनी सांगितले की, “अलर्टसाठी कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलिसांना गस्त घालण्यास पाठवले आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे विरोध प्रदर्शन करण्याची गोष्ट समोर आली नाहीये. तसेच, घरातील कोणत्याही व्यक्तीने आम्हाला कोणत्याही सुरक्षेची मागणीही केली नव्हती. तरीही ही आमची दैनंदिन गस्त आहे. कुलदीपच्या घराबाहेर आमची पोलिसांची टीम उपस्थित आहे.”
भारताचे विजेतेपदाचं स्वप्न तुटलं
भारतीय संघ (Team India) विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात (World Cup 2023 Final) प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 10 विकेट्स गमावत फक्त 240 धावाच करू शकला होता. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेड याच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 43 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, सहाव्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी नावावर केली. यावेळी भारताचे तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक किताब जिंकण्याचे स्वप्नही तुटले. (big news police patrolling outside kuldeep yadav house after india defeat in world cup 2023 final)
हेही वाचा-
IPLमध्ये षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या धोनीच्या हुकमी एक्क्याची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार का कमाल?
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल