अमेरिकेत पहिल्यांदा आयोजित केलेल्या मेजर लीग टी-20 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय न्यूयॉर्क संघाने पटकावले. मेजर लीगच्या या पहिल्यां हंगामात एमआय न्यू यॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यात खेळला गेला. निकोलस पूरन याच्या नेतृत्वातील न्यूयॉर्क संघाने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. अंतिम सामना जिंकल्यानंतर न्यूयॉर्क संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड याने थेट वेस्ट इंडीजचा दिग्गज ड्वेन ब्राव्हो याला व्हिडिओ कॉल केला.
https://www.instagram.com/reel/CvWzLpUt75g/?igshid=MzRlODBiNWFlZA==
एमआय न्यूयॉर्क संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या सिएटल ऑर्कास संघाने 20 षटकात 9 बाद 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात एमआय न्यूयॉर्कसाठी कर्णधार निकोलस पूरन याने अवघ्या 55 चेंडूत 137* धावा केल्या. पूरनच्या या वादळी खेळीच्या जोरावर न्यूयॉर्कने हा सामना अवघ्या 16 षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर जिंकला. पूरनला सामनावीर म्हणून निवडले गेले. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मालकीचे संघ जगभरातील टी20 लीगमध्ये खेळत असून हे त्यांचे नववे विजेतेपद आहे.
या स्पर्धेच्या सुरुवातीला न्यूयॉर्क संघाचा कर्णधार म्हणून कायरन पोलार्ड याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एलिमिनेटर सामन्यात दुखापत झाल्याने तो चॅलेंजर सामना आणि अंतिम सामना खेळू शकला नाही. असे असले तरी संघाने विजेतेपद मिळवल्याने, तो विजेता ठरला. यासोबतच त्याच्या नावे विविध स्पर्धांमध्ये मिळून 16 विजेतेपदे झाली. याबाबतीत त्याने आपलाच वेस्ट इंडीजचा माजी सहकारी ड्वेन ब्राव्हो याची बरोबरी केली.
विजेतेपद जिंकल्यानंतर पोलार्ड याने थेट ब्राव्होला व्हिडिओ कॉल करत आपण तुझी बरोबरी केल्याचे सांगितले. चॅलेंजर्स सामन्यात ब्राव्होच्या टेक्सास संघाचा पराभव केल्यानंतर पोलार्डने ब्राव्होला विमानाचा इशारा करत घरी जा, असे गमतीत म्हटलेले.
(Pollard And Bravo Video Call After MLC Final)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल