---Advertisement---

पोलार्डच्या ‘त्या’ निर्णयाने सगळे झाले चकित, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात घडली घटना

On: रविवार, जुलै 25, 2021 7:15 PM
---Advertisement---

यजमान वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा वनडे सामना ४ गड्यांनी जिंकत तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ऑस्ट्रेलियाने पावसाने पावसाने बाधित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ४७.१ षटकांत १८७ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने ३८ षटकांत ६ गडी गमावून १९१ धावा करुन सामना जिंकला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा सामना (२२ जुलै) गुरुवारी होणार होता. मात्र, वेस्ट इंडीजच्या पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा सामना पुढे ढकलला गेलेला.

सामन्यात वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन नाबाद अर्धशतक झळकावून आपल्या संघाला जिंकण्यात यशस्वी झाला. या सामन्यात जिथे वेस्ट इंडिजला विजय मिळाला, दुसरीकडे अशीच एक अन्य घटना घडली जी सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १६ व्या षटकात हुसेनने नो-बॉल टाकला, त्यानंतर जे घडले ते चकित करणारे होते.

अशी घडली घटना
ऑस्ट्रेलियन डावातील सोळावे षटक वेस्ट इंडीजचा अकील हुसेन टाकत होता. या षटकातील दुसरा चेंडू नो-बॉल टाकला गेला. ज्यावर एकही धाव गेली नाही. त्यामुळे फलंदाजाला फ्री हिट मिळाली. नियमानुसार जर नो-बॉलवर स्ट्राइक बदलली नसेल तर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षण बदलता येत नाही. मात्र, यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने काहीशी आगळीक केली. त्याने कुठलाही विचार न करता सरळ मैदान सोडले. वेस्ट इंडीजने पुढील चेंडूवर १० क्षेत्ररक्षकांसह क्षेत्ररक्षण केले. त्याच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

यापूर्वीदेखील घडली आहे अशी घटना
विशेष म्हणजे क्रिकेट मैदानावर अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. कारण, इंग्लंडचा ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात असेच कृत्य केले होते. या प्रकारामुळे आता सोशल मीडियावरील लोकांनी पंचांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या विजयामुळे मालिका आता बरोबरीत आली असून, मालिकेतील शेवटचा सामना २७ जुलै रोजी खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

अरेरे! भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी

Video: चाहत्यांना मिळाला ‘इंडियन मलिंगा’, टीएनपीएलमध्ये घालतोय धुमाकूळ

उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचा पाकिस्तानच्या ‘या’ महत्त्वाच्या मालिकेला फटका; युएईतून श्रीलंकेत हलवले सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---